कर्नाटकाची राजधनी बंगळुरूमधील एका स्टार्टअप कंपनीत सीईओ पदावर असणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. स्वतःच्याच 4 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. गोव्याला फिरायला जाऊन, तिथेच एका सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
माहितीनुसार, सूचना सेठ (Suchana Seth, 39) असं या महिलेचं नाव आहे. शनिवारी तिने नॉर्थ गोवामधील सोल बनयान ग्रांदे या हॉटेलमध्ये चेक-इन केलं होतं. यावेळी तिने आपला कर्नाटकातील बंगळुरूचा पत्ता नोंदवला होता. हॉटेलमधील 404 क्रमांकाच्या रुममध्ये ती थांबली होती. यावेळी तिच्यासोबतच तिचा चार वर्षांचा मुलगाही होता (Start-up CEO kills 4-year-old son in Goa).
सोमवारी तिने हॉटेलच्या स्टाफला आपल्यासाठी टॅक्सीचा बंदोबस्त करण्यास सांगितलं. बंगळुरूपर्यंत थेट टॅक्सीने जाण्याची तिची योजना होती. यावेळी हॉटेलच्या स्टाफने तिला हेदेखील सांगितलं, की विमानाने गेल्यास जास्त सोपं आणि स्वस्त पडेल. मात्र, तिने टॅक्सीचीच मागणी केली. यानंतर हॉटेलने तिच्यासाठी एक टॅक्सी अरेंज केली. तिने रुम सोडल्यानंतर जेव्हा क्लीनिंग स्टाफ तिच्या रुममध्ये गेला, तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसून आले. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं. कळंगुट ठाण्यातील पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले असता असं दिसून आलं की सेठ यांनी जेव्हा हॉटेल सोडलं, तेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत नव्हता. यानंतर नाईक यांनी टॅक्सी ड्रायव्हरला फोन केला, आणि सूचना सेठ यांच्याकडे फोन देण्यास सांगितलं. त्यांनी सेठ यांना मुलाबाबत प्रश्न विचारले असता, आपण मुलाला एका मित्राच्या घरी सोडल्याचं सेठ म्हणाल्या. त्यांनी त्या मित्राचा पत्ताही पोलिसांना फोनवर सांगितला. पोलिसांनी या पत्त्याचा शोध घेतला असता, तो खोटा असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर नाईक यांनी टॅक्सी चालकाला पुन्हा फोन केला. यावेळी त्यांनी कोंकणी भाषेत बोलून, CEO सेठ यांना कळणार नाही अशा प्रकारे टॅक्सी ड्रायव्हरला गाडी जवळच्या एखाद्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितली. तोपर्यंत टॅक्सी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात पोहोचली होती.
नाईकांनी सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हरने टॅक्सी ऐमंगला पोलीस ठाण्यामध्ये नेली. गोवा पोलिसांनी आधीपासूनच फोन करून स्थानिक पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली होती. त्यामुळे टॅक्सी पोलीस स्थानकाच्या आवारात येताच पोलिसांनी सेठ यांना ताब्यात घेऊन गाडी तपासण्यास सुरुवात केली. यावेळी सेठ यांच्या बॅगेत त्यांच्या मुलाचा मृतदेह आढळला. यानंतर सूचना सेठ यांना आपल्या ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचं एक पथक चित्रदुर्गकडे रवाना झालं. त्यांना गोव्यामध्ये परत आणून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
Start-up CEO kills 4-year-old son in Goa
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements