पालघर (महाराष्ट्र) : पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लाकडे आणण्यासाठी खाडी पात्र ओलांडणाऱ्या एका तरुणावर शार्क माशाने (Shark Fish) हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की शार्क माशाने त्याच्या पायाचा अक्षरश लचकाच तोडला होता. विकी सुरेश गोवारी (वय 32) असे या तरूणाचे नाव असून सुदैवाने या घटनेतून तो बचावला आहे.
मनोर लगतच्या वैतरणा खाडी पात्रात आलेल्या दोनशे किलो वजनी शार्क माशाने मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाला गंभीर जखमी केले आहे. यामध्ये जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे दोनशे किलो वजन असलेला शार्क मासा पकडण्यात मनोर ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड डोंगरीच्या ग्रामस्थांना यश आले आहे.
वैतरणा खाडी पात्रात ओहोटीच्या वेळी पाण्याचा स्तर कमी झाल्याने शार्क माशा मासेमारी करणाऱ्या ग्रामस्थांना दिसला. शार्क माशाने खाडी पात्राच्या पलीकडे लाकडे आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा घेत पायाचा लचका तोडला आहे. या शार्क माशाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
Shark attack in Palghar
Shark attack in Palghar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements