Ranjith Sreenivasan murder case
भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी केरळच्या एका स्थानिक कोर्टानं पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या 14 सदस्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. (Ranjith Sreenivasan murder case | Mavelikara court awards death penalty) केरळमधील भाजपचे ओबीसी विंगचे नेते रणजीत श्रीनिवासन यांची अलाप्पुझा जिल्ह्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या कुटुंबियांसमोरच पीएफआयच्या सदस्यांनी 19 डिसेंबर 2021 रोजी जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.
यामध्ये 20 आरोपींपैकी 15 आरोपी दोषी ठरले होते, यापैकी 8 जणांचा या कृत्यात थेट हात होता. तर इतर चार जणंही यात दोषी ठरले होते. हे चौघे हातात धारदार शस्त्रे घेऊन घटनास्थळी आले होते. याप्रकरणी जिल्हा न्या. व्ही. जी. श्रीदेवी यांनी दोषींना फाशीची शिक्षा सुनावली.
मृत नेत्याच्या वकिलाने सांगितले की, शिक्षा झालेले सर्व आरोपी ट्रेंड किलर स्क्वाडचा भाग होते. रणजीत यांची आई, पत्नी आणि मुलासमोर ज्या क्रूर आणि निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्यामुळे हा खून दुर्मिळ गुन्ह्यांच्या श्रेणीत येतो. 19 डिसेंबर 2021 रोजी रणजित श्रीनिवास अलाप्पुझा शहरातील त्यांच्या घरी मॉर्निंग वॉकसाठी तयार होत असताना हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले. यावेळी त्यांची आई, पत्नी आणि मूलही घरात होते. या हल्लेखोरांनी भाजप नेत्याला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने रणजित यांचा जागीच मृत्यू झाला. रणजीत यांनी नुकतीच भाजपचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. ते पेशाने वकील होते.
एक दिवसापूर्वी एसडीपीआय नेत्याची हत्या : सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) नेत्याची रंजीत श्रीनिवास यांच्या हत्येच्या एक दिवस आधी हत्या करण्यात आली होती. 18 डिसेंबरच्या रात्री एसडीपीआयचे राज्य सचिव केएस शान आपल्या बाईकवरून घरी परतत असताना त्यांना एका कारने धडक दिली. यानंतर त्यांच्यावर चाकूने अनेक वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
Ranjith Sreenivasan murder case
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements