उरलेल्या 2 मूर्तींचं काय होणार?
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त (Ram Mandir Pran Pratishtha) देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. नव्या मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती विधीपूर्वक आणली जाणार आहे. प्रतिष्ठापनेसाठी 3 मूर्त्या घडवण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी एका मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून दोन मूर्त्यांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अयोध्येत मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे धार्मिक विधी सुरु झालेले आहेत. रामलल्लाच्या मूर्तीची बुधवारी रामजन्मभूमी परिसरात मिरवणूक काढण्यात आली. गुरुवारी मूर्तीचा गर्भागृहात प्रवेश होणार आहे. कर्नाटकातील म्हैसुरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलं की, रामलल्लाच्या उर्वरित दोन मूर्ती मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येतील. मंदिराचा पहिला मजला तयार होताच दुसऱ्या मूर्तीची विधीवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली जाईल आणि त्यानंतर शेवटच्या मजल्यावर तिसरी मूर्ती स्थापित केली जाईल (Ram Lalla statue sculptor Arun Yogiraj).
अयोध्येतील राम मंदिरासाठी तीन कलाकारांनी तीन मूर्ती साकारल्या होत्या. राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने कर्नाटक येथील शिल्पकार अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड केली. 22 जानेवारी रोजी मंदिरातील गर्भागृहात याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. इतर दोन मूर्तींपैकी एक कर्नाटक येथील भट्ट यांनी घडविली होती. तर दुसरी राजस्थानमधील सत्य नारायण पांडे यांनी घडविली होती. तिन्ही मूर्तींची उंची 51 इंच इतकी आहे. ज्यामध्ये पाच वर्षांच्या प्रभू रामाला साकारलेलं आहे (जुन्या राम मंदिरातील दर्शन बंद होणार).
रामलल्लाच्या तिन्ही मूर्ती मुंबईतील प्रसिद्ध कलाकार वासुदेव कामथ यांच्या रेखाटनावर आधारित आहेत. त्यांनी रामजन्मभूमी ट्रस्टला रामलल्लाचे पेन्सिल स्केच सादर केले होते. त्यावर आधारित मूर्तीची घडण करण्यात आलेली आहे.
Ram Lalla statue by Karnataka sculptor Arun Yogiraj
Ram Lalla statue sculptor Arun Yogiraj
Ram Lalla statue sculptor Arun Yogiraj
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements