अयोध्या Ayodhya Ram Mandir : अयोध्येतून एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 20 जानेवारीपासून जुन्या राम मंदिरातील दर्शन बंद होणार आहे. पण त्यानंतर 23 जानेवारीपासून नव्या राम मंदिरात दर्शन घेता येणार आहे. रामभक्तांनी 22 जानेवारीला आपापल्या घरी, मंदिरात राम मंदिराचा उत्सव साजरा करावं, असं आवाहन राम मंदिर ट्रस्टकडून करण्यात आलं आहे. येत्या 20 जानेवारीपासून मंदिरात तयारी केली जाणार आहे. त्यामुळे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्यवस्था प्रमुख शरद शर्मा यांनी दिली. येणाऱ्या निमंत्रितांच दर्शन व्हावं आणि गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Ayodhya Ram Mandir
अयोध्येत राम उत्सवाच्या निमित्ताने पूर्ण अयोध्या नगरीला रंगवण्याचं काम जोरात सुरु आहे. अयोध्येत इमारतींना नव्याने रंग लावले जात आहे. अयोध्या नगरी नव्याने रेखाटली जात आहे. इमारतींवर प्रभू श्रीरामांचं चित्र रेखाटलं जात आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांना अयोध्या नगरीत आणि राम राज्यात आल्याचा भास व्हावा यासाठी रामांचे चित्र इमारतींवर रेखाटलं जात आहे. अयोध्येच्या मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या इमारतींवर प्रभू श्रीरामांचे मोठमोठे प्रतिकृती तयार करण्यात आली आहेत (Ayodhya Ram Mandir).
अयोध्येत राम मंदिरासाठी गुजरातच्या बडोदा येथून 108 फूट लांबीची अगरबत्ती अयोध्येत दाखल झाली आहे. ही अगरबत्ती पाहण्यासाठी अयोध्येच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली बघायला मिळाली. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये अगरबत्तीचा फोटो आणि व्हिडीओ काढत होते. बडोदा येथून एका मोठ्या ट्रकमधून ही 108 फूट लांबीची अगरबत्ती अयोध्येच्या दिशेला रवाना झाली होती. त्यानंतर आज ही अगरबत्ती अयोध्येत दाखल झाली आहे. अगरबत्ती खराब होऊ नये किंवा तिचा सुगंध जाऊ नये यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली आहे. या अगरबत्तीला लोखंडी पाईपचं कोटींग करण्यात आलं आहे. येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होतंय. त्यादिवशी ही अगरबत्ती लावण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिकांना 22 जानेवारीला दीपोत्सव साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. या दिवशी सर् नागरिकांना घरात दिवे लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच अयोध्येत जुन्या तपस्वी छावणीमध्ये देव दिवाळीला सुरुवात करण्यात आली आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements