मुंबई : अभिनेता विद्युत जामवाल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बॉलिवूडच्या ॲक्शन अभिनेत्याच्या यादीत विद्युत जामवाल अव्वल स्थानी आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. विद्युत जामवाल लवकरच ‘क्रॅक’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. कायम भयानक स्टंट करणारा विद्युत जामवाल पोलिसांच्या ताब्यात आहे. सार्वजनिक ठिकाणी धोकादायक स्टंट केल्यामुळे अभिनेत्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता विद्युत जामवाल याची चर्चा रंगली आहे (Railway police detained actor Vidyut Jamwal for performing dangerous stunts).
रिपोर्टनुसार, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या वांद्रे कार्यालयातून विद्युत जामवाल याचे काही फोटो सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. अभिनेता पोलिस स्थानकात एका खूर्चीवर बसलेला दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आरपीएफ कार्यालय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला धोकादायक स्टंट केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं होतं, परंतु अद्याप संबंधीत प्रकरणी अधिकृत माहिती मिळालेली नाही.
अभिनेता विद्युत जामवाल याने अनेक सिनेमांमध्ये धोकादायक स्टंट करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता धोकादायक स्टंटमुळेच अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विद्युत जामवाल फक्त अभिनेता नाही तर, मार्शल आर्टिस्ट देखील आहे. ‘कमांडो’ सिनेमानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अभिनेत्याने फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकला आहे.
विद्युत जामवाल याच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने ‘Sakthi’ या तेलूगू सिनेमातून अभिनेत्याने करियरला सुरुवात केला. त्यानंतर ‘फोर्स’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘कमांडो’‘अनजान’, ‘बादशाहो’, ‘कमांडो 2’, ‘जंगली’ ‘यारा’, ‘कमांडो 3’ आणि ‘सनक’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये विद्युत जामवाल याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्याचं मनोरंज केलं.
विद्युत जामवाल फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. अभिनेत्री करिश्मा कपूर हिची सवत आणि उद्योजक संजय कपूर याची पहिली पत्नी नंदिता महतानी (Nandita Mahtani) हिला डेट करत आहे. दोघे लवकरच लग्न करण्याची देखील चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील विद्युत जामवाल आणि नंदिता महतानी यांचे फोटो व्हायरल होत आहे. दोघांचा साखरपुडा देखील झाला. अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.
Railway police detained actor Vidyut Jamwal
Railway police detained actor Vidyut Jamwal
Railway police detained actor Vidyut Jamwal
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements