PM Narendra Modi attends the wedding of Suresh Gopi’s daughter in Guruvayur : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळी पंतप्रधान येथे पोहोचले होते. यानंतर आज, म्हणजेच बुधवारी त्यांनी त्रिशूरमधील गुरुवायूर मंदिरात पूजा केली. यानंतर साउथ अभिनेते आणि नेते सुरेश गोपी (Suresh Gopi) यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली. लग्नादरम्यान पंतप्रधानांनी केरळचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. यावेळी पीएम मोदींची खास स्टाइल पाहायला मिळाली.
अभिनेते सुरेश गोपी यांची मुलगी भाग्य सुरेश आणि वरण श्रेयस यांचा विवाह गुरुवायूर मंदिरात अगदी साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी पंतप्रधानांनी स्वतःच्या हातांनी वधू-वरांना पुष्पहार दिला आणि. जयमालानंतर आशीर्वाद दिले. यावेळी साउथचे अनेक अभिनेतेही उपस्थित होते. पण, सर्वांच्या नजरा पीएम मोदींवरच होत्या.
यावेळी गुरुवायूर मंदिरात लग्न करणाऱ्या इतर जोडप्यांनाही पंतप्रधानांनी आशीर्वाद आणि नवविवाहित जोडप्यांना भेटवस्तूही दिल्या. दरम्यान, सुरेश गोपी यांच्या मुलीच्या लग्नाला दक्षिणेतील सुपरस्टार मामूट्टी, मोहनलाल, दिलीप, बिजू मेनन यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली होती. पंतप्रधानांनी या कलाकारांचीही भेट घेतली.
PM Modi wedding Suresh Gopi daughter Guruvayur
PM Modi wedding Suresh Gopi daughter Guruvayur
PM Modi wedding Suresh Gopi daughter Guruvayur
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements