PM Modi enjoys snorkelling in Lakshadweep
PM मोदींचा एक उनाड दिवस…! समुद्रात डुबकी, स्नॉर्कलिंग अन् बीचवर फेरफटका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:चे काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. पंतप्रधान मोदी लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत. मोदींनीची सोशल मीडियावरुन लक्षद्वीपमधील काही फोटो शेअर केलेत. एका फोटोत मोदी समुद्रकिनाऱ्यावर उभे असल्याचं दिसत आहे (Prime Minister Narendra Modi shared pictures of him trying out snorkeling in Lakshadweep).
अन्य एका फोटोमध्ये पंतप्रधान मोदी समुद्रकिनाऱ्यावर खुर्चीवर बसून अथांग समुद्र न्याहाळताना दिसत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरुन दिसणाऱ्या बेटाचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. लक्षद्वीपचा एरियल व्ह्यू सुद्धा या फोटोंमधून शेअर केलेल्याचं पाहायला मिळतंय.
लक्षद्वीपमध्ये पंतप्रधान मोदींनी स्नॉर्कलिंगचाही आनंद घेतला. ‘हा अनुभव फारच थरारक आणि आनंद देणारा आहे’, असं पंतप्रधान मोदी कॅप्शनमध्ये म्हणाले आहेत. लाइफ जॅकेट घालून समुद्रातून बाहेर येताना पंतप्रधान मोदींचा हा फोटो चर्चेचा विषय ठरतोय. समुद्रात पंतप्रधान मोदींना दिसलेले मासे आणि प्रवळांचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. मोदींना दिसलेले हे दृष्यही शेअर करण्यात आलं आहे. मोदींनी समुद्रकिनारी बसून वाचनाचाही आनंद घेतला. समुद्रकिनारी वॉकचा आनंद घेताना पंतप्रधान मोदी दिसले.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements