- ‘तो’ दावा खोटा Fact Check: व्हायरल झालेला फोटो
- Fact Check: Does This Image Show Jay Shah Posing With Pakistani General’s Son?
2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि एका तरुणासोबत दिसत आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते हा फोटो शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की, जय शाह यांचा मुलगा आणि पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या मुलासोबत फोटोमध्ये दिसत आहेत. याद्वारे युजर्स अमित शाह यांना टार्गेट करत आहेत.
विश्वास न्यूजने केलेल्या तपासात (Fact Check) उर्वशी रौतेलाचा भाऊ यशराज रौतेला हा व्हायरल फोटोमध्ये जय शाहसोबत असल्याचे आढळले आहे. आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान हा फोटो काढण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या मुलाशी त्याचा कोणताही संबंध नाही.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये? : फेसबुक वापरकर्ता बिलाल खानने 28 मे रोजी फोटो (अर्काईव्ह लिंक) शेअर केले आणि लिहिले, निवडणुकीच्या काळात हा फोटो देशात चर्चेचा विषय बनला आहे. निवडणुकीच्या वेळी पाकिस्तानच्या विरोधात बोलणारे गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शाह आणि पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जाविद बाजवा यांचा मुलगा दुबईत एकत्र फोटोशूट करत आहे आणि इथे अमित शाह हिंदू-मुस्लिम खेळ खेळत आहेत.
कसा केला तपास? : विश्वास न्यूजने गुगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने व्हायरल फोटो शोधले. हा फोटो जय टीव्ही नावाच्या वेबसाइटवर 1 सप्टेंबर 2022 रोजीच्या बातमीत वापरण्यात आला आहे. त्यात लिहिले आहे की, भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला उपस्थित होती. ती अमित शहा यांचा मुलगा जय शाहसोबत सामना पाहताना दिसली. यादरम्यानचे अभिनेत्रीचे तिचा भाऊ यशराज रौतेला आणि जय शाहसोबतचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. 30 ऑगस्ट 2022 रोजी, बॉलीवूड गलियारा नावाच्या फेसबुक वापरकर्त्याने देखील हे चित्र (अर्काईव्ह लिंक) पोस्ट केले आणि जय शाह, यशराज आणि उर्वशी असे वर्णन केले आहे. त्यानुसार हे चित्र आशिया चषक 2022 मधील भारत-पाक सामन्याचे आहे.
AsliUrvashians नावाच्या फेसबुक वापरकर्त्याने हा फोटो (अर्काईव्ह लिंक) 29 ऑगस्ट 2022 रोजी पोस्ट केला होता आणि तो जय शाह आणि यशराज रौतेला यांचा असल्याचा दावा केला होता. हा फोटो 29 ऑगस्ट 2022 रोजी (अर्काईव्ह लिंक) teamurvashirautelaofficial नावाच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलद्वारे पोस्ट केला गेला होता. यामध्ये जय शाह आणि यशराज रौतेला यांचा फोटो असे वर्णन करण्यात आले आहे. यशराज आणि व्हायरल चित्र येथे पाहिले जाऊ शकते. याआधीही असाच दावा करत हा फोटो व्हायरल झाला होता. विश्वास न्यूजने त्यावेळी उर्वशीच्या पीआरशी संपर्क साधला होता. या फोटोत जय शाहसोबत यशराजच्या उपस्थितीची त्यांनी पुष्टी केली होती. खोट्या दाव्यासह फोटो शेअर करणाऱ्या फेसबुक वापर कर्त्याचे प्रोफाइल विश्वास न्यूजने स्कॅन केले. फैजाबादमध्ये राहणाऱ्या या युजरला 688 लोक फॉलो करतात.
निष्कर्ष : व्हायरल झालेला फोटो जय शाह आणि उर्वशी रौतेलाचा भाऊ यशराजचा आहे. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या मुलाशी त्याचा कोणताही संबंध नाही. (‘vishvasnews’ या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून आम्ही याचं भाषांतर केलेलं आहे.)
Photo of Jay Shah with Urvashi Rautela
Photo of Jay Shah with Urvashi Rautela
Photo of Jay Shah with Urvashi Rautela
Photo of Jay Shah with Urvashi Rautela
Photo of Jay Shah with Urvashi Rautela
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements