गर्लफ्रेंड समोरच केली त्याच्या दुसऱ्या अफेअरची पोलखोल
बरेच लोक आपल्या घरात पोपट (parrot) पाळतात जे आपल्या मालकांना बघून मनुष्यांसारखे बोलू लागतात. ते साउंड कॉपी करतात आणि नंतर मनुष्यांसारखं बोलू लागतात. पण अनेक बोलणाऱ्या पोपटांमुळे मालकांची फजितीही होते. असंच काहीसं एका तरुणासोबत झालं. या तरुणाचा पाळीव पोपट त्याच्या गर्लफ्रेंड समोर असं काही बोलला ज्यामुळे दोघांचं रिलेशनशिप बिघडलं आहे. तरुणीने याचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर असे काही ग्रुप आहेत ज्यावर लोक नाव न सांगता आपल्या गोष्टी शेअर करत असतात आणि लोकांकडून सल्ले घेत असतात. असंच एका तरुणीने केलं. तिने तिच्या बॉयफ्रेंड (Pet Parrot Expose Boyfriend Affair) बाबत असं काही सांगितलं जे हैराण करणारं आहे. @AlaskaStiletto नावाच्या यूजरने आपला बॉयफ्रेंड आणि त्याच्या पाळीव पोपटाबाबत सांगितलं.
25 वर्षीय तरुणीने लिहिलं की, ती एका अजब स्थितीत अडकली आहे. एक दिवस ती तिच्या 26 वर्षीय बॉयफ्रेंड जॉनीच्या घरी फॅमिली डिनरसाठी गेली होती. तिथे तरुणाने आई-वडिलही होते. त्यांच्याकडे एक पाळीव पोपट आहे ज्याचं नाव पर्सी आहे. तरुणीने सांगितलं की, पर्सी रात्रभर जेस नावाच्या तरुणीचं नाव घेत राहिला आणि म्हणाला की, जॉनी जेसवर प्रेम करतो. पण ती अशा कोणत्याही मुलीला ओळखत नाही जी तिच्या बॉयफ्रेंडच्या परिवारात आहे. जेव्हा जेव्हा पोपट त्या तरुणीचं नाव घेत होता, बॉयफ्रेंड अस्वस्थ होत होता. डिनरवेळी तरुण फोनकडे अस्वस्थ होत बघत होता आणि फोन उलटा करून टेबलवर ठेवत होता. असं तो नेहमी करत नसतो. जेव्हा रात्री तरुणीने त्याला विचारलं की, जेस कोण आहे आणि पोपट कोणाबाबत बोलत आहे तर तो भडकला. तो तरुणीवर ओरडू लागला आणि म्हणाला की, तू केवळ एका पोपटाच्या सांगण्यावरून आपल्या बॉयफ्रेंडवर संशय करत आहे जे चुकीचं आहे.
जेसने सांगितलं की, जेव्हा दोघांमधील वाद वाढला तेव्हा ती आपल्या घरी परत गेली आणि तेव्हापासून ती तरुणासोबत बोलली सुद्धा नाही. तिने लोकांना विचारलं की, ती तिच्या जागी बरोबर आहे का आणि तिने असा विचार करायला हवा की नको? अनेकांनी कमेंट करत तिला सल्ला दिला की, तुला हे ठरवावं लागेल की, तुला त्या तरुणासोबत रहायचं आहे किंवा नाही. दुसऱ्याने लिहिलं की, तू आणखी माहिती काढली पाहिजे आणि मगच निर्णय घेतला पाहिजे.
parrot exposed his dirty affair
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements