बेळगाव—belgavkar / कोल्हापूर : चंदगड तालुक्याच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या उंच डोंगरमाथ्यावर विसावलेल्या ऐतिहासिक शिवकालीन किल्ले पारगड येथे रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी रायबा मालुसरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत होणार आहे. सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेला शिवकालीन पारगड किल्ला उंच असल्याने कोकणातून येणाऱ्या पोर्तुगीजांवर नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निवड केली होती.
पुढे हा किल्ला आंदण म्हणून गडकऱ्यांना देत चंद्र-सूर्य असेपर्यंत हा किल्ला जागता ठेवा, या शिवरायांच्या आज्ञेचे पालन करणारे शिवभक्त व नरवीर स्वराज्यनिष्ठ तानाजीराव मालुसरे यांचे शूर पुत्र सुभेदार रायबा तानाजीराव मालुसरे यांचे जगातील पाहिले स्मारक किल्ले अजिंक्य पारगड येथे साकार झाले आहे.
सीमाभाग बेळगावसह चंदगड तालुक्यातील सर्व शिवभक्त, बंधूभगिनींनी उपस्थित राहून या पवित्र ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याची शोभा वाढवून सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Pargad Fort Raiba Malusare Statue belgav belagavi belgavkar explore digital india
Pargad Fort Raiba Malusare Statue
Pargad Fort Raiba Malusare Statue
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements