Best Debut Film and Best Feature Film categories
राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत (National Film Awards) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बक्षिसाची रक्कम आणि 2 श्रेणींच्या पुरस्कारांची नावे बदलण्यात आली आहेत. दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ (Indira Gandhi Award for Best Debut Film of a Director) आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी ‘नर्गिस दत्त पुरस्कार’ (Nargis Dutt Award for Best Feature Film on National Integration) ही पुरस्करांची 2 नावे बदलण्यात आली आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत कोणकोणते मोठे बदल करण्यात आले आहेत? जाणून घेऊयात….
Indira Gandhi, Nargis Dutt’s names dropped from National Film Awards categories
names of former Prime Minister Indira Gandhi and late actor Nargis Dutt will not be used at the upcoming awards ceremony.
समितीने सुचविलेल्या बदलांनुसार, दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ हे नाव बदलून ‘दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट’, असे करण्यात आले आहे. तर नॅशनल इंटिग्रेशनवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा ‘नर्गिस दत्त पुरस्कार’ आता ‘राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’ म्हणून ओळखला जाईल. या श्रेणीमध्ये, सामाजिक समस्या आणि पर्यावरण संरक्षणासाठी पुरस्कार श्रेणी एकत्रित केल्या आहेत.
बक्षिसाची रक्कम, जी आधी निर्माता आणि दिग्दर्शकामध्ये विभागली जात होती, ती आता फक्त दिग्दर्शकाला दिली जाईल. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीच्या एका सदस्याने पीटीआयला सांगितले की, समितीने कोरोनाच्या काळात बदलांचा विचार केला होता. हे बदल करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
National Film Award Indira Gandhi Nargis Dutt
National Film Award Indira Gandhi Nargis Dutt
National Film Award Indira Gandhi Nargis Dutt
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements