प्रसिद्ध चित्रपट ‘3 Idiots’ मधला एक सीन खऱ्या आयुष्यामध्ये पाहायला मिळाला आहे. आपल्या आजारी असलेल्या आजोबाला हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी नातवाने आपली टूव्हिलर थेट आपत्कालीन वॉर्डमध्येच घुसवली आहे. मध्य प्रदेशातील सटणा जिल्ह्यातील हा प्रकार आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ एकाने शूट केला. त्यानंतर हा Video सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निरज गुप्ताचे आजोबा बेशुद्ध पडले होते. अशावेळी तो त्यांना तात्काळ आपल्या बाईकवरुन सरदार वल्लभभाई पटेल जिल्हा रुग्णालयात घेऊन आला. यावेळी त्याने गाडी थेट आपत्कालीन वॉर्डरुममध्येच नेली. व्हिडिओमध्ये दिसतंय की, गुप्ताचे आजोब शुद्धीत नाहीत. एक व्यक्ती आजोबाला धरुन मागे बसला आहे. तर निरज गुप्ता गाडी चालवत आहे. (Recreating Scene From ‘3 Idiots’, Man Rides To Hospital Emergency Ward With His Grandfather)
Family over everything ❤️
— Mangesh Yadav (@Mangeshyadav09) February 11, 2024
निरज गुप्ता आजोबांना तात्काळ उपचार मिळवून देण्यासाठी कशाचीही परवा न करता टूव्हिलर थेट हॉस्पिटलमध्ये आणतो. वॉर्डरुममध्ये आल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि हॉस्पिटलमधील एक कर्मचारी आजोबांना गाडीवरुन खाली उतरवताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर निरज गुप्ता टूव्हिलर घेऊन परत फिरतो. गाडी बाहेर लावून तो परत आपल्या आजोबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतो.
निरज गुप्ताने गाडी हॉस्पिटलमध्ये आणल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. हॉस्पिटलमधील रुग्ण, कर्मचारी या घटनेकडे आश्चर्याने पाहत होते. मात्र, आजोबांची गंभीर स्थिती पाहून त्याने हे धाडस केल्याचं समजत आहे. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आजोबांवर डॉक्टरांनी उपचार सुरु केले आहेत. दरम्यान, सदर प्रकार पाहून थ्री इडियट्स चित्रपटाची आठवण आली नाही तर नवलच.
Man Rides To Hospital With His Grandfather
Man Rides To Hospital With His Grandfather
Man Rides To Hospital With His Grandfather
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements