Lok Sabha Elections 2029 To Conclude Before Summer?
- CEC Rajiv Kumar Shares His ‘Biggest Learning’ From 2024 Polls
- Next Lok Sabha polls to be over by end of April
Lok Sabha Elections 2029
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा तब्बल अडीच महिन्यांचा कार्यक्रम मंगळवारी (ता. 4) आटोपणार आहे. पण मतमोजणीआधीच आयोगाने 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. ही निवडणूक कधी होणार, याचे संकेत आयोगाने आताच दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात 7 टप्प्यांमध्ये घेतलेल्या मतदानावरून विरोधकांकडून बरीच टीका करण्यात आली. त्यातच निवडणूक कालावधीत आलेल्या उष्णतेच्या लाटेने मतदानावर विपरीत परिणाम झाला. अनेक मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली.
आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर महिनाभराने म्हणजे 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील तर अडीच महिन्यांनी म्हणजे 1 जूनला अखेरच्या टप्प्यातील मतदान झाले. या काळात निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांना उष्णतेचा त्रास सहन न झाल्याने काहींचा मृत्यू झाला. तर काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. उन्हाच्या झळांनी मतदारांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही चांगलाच घाम गाळावा लागला. यातून निवडणूक आयोगाने धडा घेतला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी (ता. 3) घेतलेल्या पत्रकार परिषदेत 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेमुळे मतदान कमी झाल्याचे मान्य करत राजीव कुमार यांनी 2029 मध्ये एप्रिलअखेरपर्यंत लोकसभेची निवडणूक संपेल, असे स्पष्ट केले.
लापता जंटलमेन : आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोग गायब होता. तसेच सोशल मीडियात ‘लापता जंटलमेन’ असे मीम्स व्हायरल झाले होते. त्यावरही राजीव कुमार यांनी भाष्य केले. आम्ही इथेच होतो, कधीच गायब झालो नाही. आता ‘लापता जंटलमेन परत आले’ मीम्समध्ये म्हणू शकता, असा टोला त्यांनी लगावला.
विश्वविक्रम : निवडणूक पार पाडणं हा चमत्कार होता. तब्बल 64 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हा विश्वविक्रम आहे. जगात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही, कधीही मतदान झालेले नाही, असे सांगत निवडणूक आयुक्तांनी मतदारांना उभे राहून सलाम केला. महिला मतदारांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. तब्बल 31.4 कोटी महिलांनी मतदान केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
Lok Sabha Elections 2029
Lok Sabha Elections 2029
Lok Sabha Elections 2029
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements