बेळगाव—belgavkar : पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यासाठी बेळगावात 3 व 4 जून रोजी मद्यविक्री बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. परंतु, सोशल मीडियावर 1 जून पासून मद्यविक्री बंद असल्याचा संदेश व्हायरल होत असून तो येथील नसून बंगळूरसाठी लागू असल्याचे समजते.
गेल्या तीन दिवसांपासून सोशल मीडियावर एक कन्नड संदेश व्हायरल होत आहे. मतमोजणी होणार असल्याने शनिवार 1 ते बुधवार 4 जूनपर्यंत सर्व बार बंद राहणार आहेत, असे त्यात म्हटले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हा प्रशासनाने असा काही आदेश काढला नसल्याचे सांगितले. मतमोजणीच्या काळात 3 जून रोजी सायंकाळपासून ते 4 जून रोजी रात्रीपर्यंत शहरातील मद्यविक्री, बार बंद राहणार असल्याचे सांगितले.
1 जूनपासून मद्यविक्री कुठे बंद राहणार आहे, याचा कानोसा घेतला असता बंगळूर व त्या भागात 4 दिवस मद्यविक्री बंद राहणार असल्याचे समोर येत आहे. विधान परिषदेसाठी मतदान व अन्य मतमोजणीमुळे तेथे 1 जूनपासूनच मद्यविक्रीवर निर्बंध आणल्याचे समोर आले आहे.
Liquor sale closed in Belgaum Loksabha
Liquor sale closed in Belgaum Loksabha
Liquor sale closed in Belgaum Loksabha
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310