कोल्हापूर-पन्हाळा : कोल्हापूर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. किल्ले पन्हाळगड समोरीलचं किल्ले पावनगडावरील अनधिकृत अतिक्रमण केलेला मदरसा (Madrasa) प्रशासनानं आज जमीनदोस्त केला. हिंदुत्ववादी संघटनेच्या (Hindu Organization) आक्रमक भूमिकेनंतर कोल्हापूर पोलीस (Kolhapur) आणि प्रशासन यांनी कमालीची गुप्तता पाळत हा अनधिकृत मदरसा रात्रीत जमीनदोस्त केला आहे.
मध्यरात्री दोन वाजता सुरू झालेली कारवाई आज सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होती. दरम्यान, किल्ले पावनगडाकडे जाणारे सर्वच रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. 1979 पासून पावनगडावर अनधिकृत मदरसा असल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिली होती. या मदरासामधील 45 विद्यार्थी शिराेली येथील मदरसा येथे पाठविण्यात आले आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
मध्यंतरीच्या कार्यकाळात हा मदरसा बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला. दरम्यान, हिंदुत्वादी संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनानं याबाबतची खातर जमा करत त्यावर कारवाई केली. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधून काही मुस्लिम तरुण या ठिकाणी सततचे ये-जा करत असल्याची माहिती देण्यात आली होती. किल्ले पावनगडावरील अनधिकृत अतिक्रमण केलेला मदरसा हटवण्यासाठी प्रशासनानं कमालीची गुप्तता पाळली होती. काल सायंकाळपासूनच या सर्व घडामोडीला वेग आला होता. किल्ल्यावर जाणाऱ्या सर्वच वाटा पोलिसांनी बंद केल्या होत्या.
त्यापूर्वी मदरशातील काही मुलांना त्यांच्या गावी वाहनाची व्यवस्था करून पाठवण्यात आलं होतं. जिल्हा पोलीस प्रमुखांसह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा किल्ले पावनगडावर रात्रीपासून मुक्काम ठोकला होता. कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळत शनिवारी सकाळी कारवाई पूर्ण केली. दरम्यान, जिल्हा प्रशासनानं या महिनाभरात दुसरी कारवाई करत किल्ले पावनगडावरील मदरसा जमीनदोस्त केला आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310