IS propagandist Mehdi Masroor Biswas
कर्नाटक-बंगळूर : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (Islamic State of Iraq and Syria (ISIS).) या संस्थेचा ट्विटर अकाउंट मॅनेजर मेहदी मसरूर बिस्वास (Pro-Islamic State Twitter account Mehdi Masroor Biswas) याला विशेष राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency (NIA)) न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ‘इसिस’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या अबू बकर बगदादीच्या नेतृत्वाखाली सीरियात दहशतवादी कारवाया होत होत्या (NIA court convicts IS propagandist Mehdi Masroor Biswas).
मेहदी हा मूळचा पश्चिम बंगालचा (West Bengal) असून, तो जलाहळ्ळीच्या सिद्धार्थनगरमधील अपार्टमेंटमध्ये राहत होता. येथून 2012 मध्ये त्याने ‘इसिस’च्या वतीने ‘शम्मीविटनेस ट्विटर’ हे खाते उघडले होते. दहशतवाद्यांनी चालवलेला रक्तपात आणि दहशतवादी ट्विट करून तरुणांना ‘इसिस’ संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करत होता.
माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर सीसीबी अधिकाऱ्यांनी 13 डिसेंबर 2014 रोजी जलाहळ्ळी सिद्धार्थनगर येथे मेहदीला अटक केली. गंगामनागुडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास अधिकारी एसीपी एम. के. तम्मय्या यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. याप्रकरणी लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली होती. ट्विटरकडून कागदपत्रे गोळा करून 37 हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते.
पोलिसांची बाजू सरकारी वकील बिक्कन्ननावर यांनी मांडली. तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीसी) एसीपी बी. आर. वेणुगोपाल यांच्या पथकाने न्यायालयात पुरावे सादर केले. प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष एनआयए न्यायालयाने आरोपी मेहदीला दहा वर्षांचा तुरुंगवास आणि 2.15 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दहशतवादी मेहदी याला अटक केल्याच्या दिवसापासून बंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहामध्ये कैदेत ठेवण्यात आले आहे. आता न्यायालयाने त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याने यापूर्वी 9 वर्षे 1 महिना तुरुंगात काढला आहे. शिक्षेची उर्वरित 11 महिने त्याला कारागृहात काढावी लागणार आहेत.
IS propagandist Mehdi Masroor Biswas
IS propagandist Mehdi Masroor Biswas
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310