Meet Pearl Kapur, India’s youngest billionaire and founder of Zyber 365
भारतात अब्जाधीशांची संख्या दरवर्षी वाढतच जाताना दिसत आहेत, यादरम्यान एक अब्जाधीश सध्या जास्तच चर्चेत आहे. अगदी कमी वयात अब्जावधी डॉलर्सची कंपनी उभी करणारे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून त्यांची ओळख सांगितली जाते. युवा उद्योगपती पर्ल कपूर यांनी अवघ्या तीन महिन्यांत आपल्या कंपनीचे व्हॅल्युएशन 1.1 बिलीयन डॉलर (सुमारे ₹ 9129 कोटी रुपये) पर्यंत पोहचवलं आहे.
पंजाब येथील पर्ल कपूर फक्त 27 वर्षांचा तरुण आहे आणि त्याच्या कंपनीचे नाव Zyber 365 आहे. या कंपनीची स्थापना त्याने गेल्या वर्षी 2023 मध्ये केली होती. ही एक भारतीय कंपनी आहे. ही कंपनी ब्लॉकचेन टेक्नोलॉजी आणि सायबर-सिक्योर एआय इकोसिस्टममध्ये एक्सपर्ट आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय युनायटेड किंग्डम येथे असून भारतातील अहमदाबाद गुजरात येथून याचा कारभार चालवला जातो.
अब्जाधीश पर्ल कपूरने दावा केला आहे की त्याने आपली कंपनी तुफान वेगाने वाढविली आहे. या कंपनीने अवघ्या 3 महिन्यांत 1.2 बिलियन डॉलर (सुमारे ₹ 9840 कोटी रुपये) चे व्हॅल्युएशन साध्य केले आहे. कंपनी भारत आणि आशियामध्ये सर्वात वेगाने वाढणारी युनिकॉर्न म्हणून उदयास आली असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. कपूर यांची संपत्ती 1.1 बिलीयन डॉलर (सुमारे ₹ 9129 कोटी रुपये) असून कंपनीत त्यांचा 90 टक्के हिस्सा आहे. कंपनीची ग्रोथ पाहूण आणि भविष्य लक्षात घेता, Sram अँड Mram ग्रुपने सीरिज ए फंडिंगमध्ये 10 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली, ज्यामुळे Zyber 365 चे व्हॅल्युएशन आणखी वाढले. Zyber 365 ईव्हीएम एक स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट प्लॅटफॉर्म आहे जो सेफ्टी, एनर्जी आणि स्थिरतेवर लक्ष केंद्रीत करतो.
कपूर यांनी प्रथम लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातून पदवी घेतली आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये एमएस्सी केलं आहे. पर्ल यांना आधीपासूनच स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. अशा तऱ्हेने एआयची वाढती क्रेझ पाहून त्यांनी मे 2023 मध्ये आपल्या उद्योजकतेचा प्रवास सुरू केला आणि Zyber 365 ची स्थापना केली. त्यापूर्वी कपूर यांनी एएमपीएम स्टोअरमध्ये आर्थिक सल्लागार आणि इंटीयर सोल्यूशन्समध्ये बिझनेस अॅडव्हायझर म्हणून काम केले. ही कंपनी सुरू करण्यापूर्वी त्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये बिलियन पे टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी देखील सुरू केली होती.
Indias youngest billionaire Pearl Kapur founder of Zyber 365
Indias youngest billionaire Pearl Kapur
Indias youngest billionaire Pearl Kapur
Indias youngest billionaire Pearl Kapur
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements