मॉस्कोमधील भारतीय दूतावासात केले होते काम
उत्तर प्रदेशमधील दहशतवादी विरोधी पथकाने पीएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेच्या एका गुप्तहेराला मेरठमधून अटक केली (Indian Embassy worker spied for Pakistan, passed on Army info; arrested from UP). धक्कादायक बाब म्हणजे या गुप्तहेराने रशियाची राजधानी मॉस्कोमधील भारतीय दूतावासात काम केले होते. अटक करण्यात आलेला सत्येंद्र सिवल हा २०२१ पासून भारतीय दूतावासात कार्यरत होता. भारतातील सुरक्षा रक्षक या पदावर तो तिथे कार्यरत होता.
भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्याची पाकिस्तानसाठी हेरगिरी, गोपनीय माहिती ISI ला दिली
दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. मॉस्कोमधील दूतावासात एक गुप्तहेर हेरगिरी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने सत्येंद्र सिवलची चौकशी केली. या चौकशीत तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही आणि त्यानंतर त्याने हेरगिरी केल्याचे कबूल करताच त्याला अटक करण्यात आले.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयचे समर्थक परराष्ट्र मंत्रालयाच्या काही कर्मचाऱ्यांना धोरणात्मक माहिती मिळविण्यासाठी पैशाचे आमिष दाखवत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. एटीएसने तंत्रज्ञानाचा वापर करत आणि त्याच्यावर पाळत ठेवत तपास केला. तपासादरम्यान सिवाल पाकिस्तानच्या आयएसआय हँडलर्ससह भारतविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचं आढळलं. सिवालने पैशासाठी संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्करी आस्थापनांच्या धोरणात्मक रणनीतीविषयी संवेदनशील माहिती लीक केल्याचा दावा एटीएसने केला आहे.
Indian Embassy worker spied for Pakistan
Indian Embassy worker spied for Pakistan
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements