fixed charge रकमेत 35 रुपये इतकी वाढ
बेळगाव—belgavkar : हेस्कॉमकडून (Hubli Electricity Supply Company (HESCOM)) वीज दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव हेस्कॉमकडून कर्नाटक वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात हेस्कॉमला 468 कोटी 5 लाख रुपये इतका तोटा झाला आहे. शिवाय 2024- 25 या आर्थिक वर्षात हेस्कॉमला 273 कोटी रुपये तोटा होईल असा अंदाज आहे. त्यामुळे तब्बल 741 कोटी रुपयांचा हा तोटा भरून काढण्यासाठी हेस्कॉमने वीज दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेस्कॉमकडून एकूण 22 प्रकारच्या वीज जोडण्या दिल्या जातात. त्या सर्व प्रकारच्या वीज जोडणीसाठी जे निर्धारित शुल्क आकारले जाते, त्या शुल्क रकमेत तसेच वीजदर आकारणीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रति युनिट 26 पैसे इतकी ही वाढ असणार आहे. शिवाय निर्धारित शुल्क (fixed charge) रकमेत 35 रुपये इतकी वाढ केली जाणार आहे. या प्रस्तावित दरवाढीविरोधात आक्षेप नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. पुढील 30 दिवसांत ग्राहकांना या विरोधात आक्षेप नोंदविता येणार आहेत.
यंदा विधानसभा निवडणुकीनंतर हेस्कॉम तसेच राज्यातील सर्व वीजपुरवठा कंपन्या सातत्याने चर्चेत आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने निवडणुकीआधी 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे; पण मोफत वीज देण्यास सुरुवात झाल्यावर वीजबिलांमध्येही मोठी वाढ झाल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली. गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी हेस्कॉम व अन्य वीज वितरण कंपन्यांकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे देण्यात आला होता. तो प्रस्ताव मे 2023 मध्ये नियामक आयोगाने मंजूर केला होता. त्यामुळे हेस्कॉम व अन्य कंपन्यांनी वीजदरवाढ लागू केली होती. एकीकडे मोफत वीज योजना सुरू झाली होती तर दुसरीकडे वीज दरवाढही लागू झाली होती. त्यामुळे अनेकांना वाढीव वीजदराचा शॉक बसला होता; पण मोफत वीजेच्या सवलतीमुळे बहुतेकांना ही दरवाढ सुसह्य झाली होती. आता पुन्हा कंपन्यांकडून वीजदरवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे, पण याचा फटका शासनालाच बसणार आहे.
Belgaum HESCOM Fixed Charge Hike Tarrif Hike Electricity belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum HESCOM Fixed Charge Hike Tarrif Hike Electricity
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310