फेसबुकवर विक्री; कुणी खाल्लाय हा अर्धवट सँडविच?
आपल्यापैकी अनेकांनी आतापर्यंत विविध प्रकारची सँडविच नक्कीच खाल्ली असतील (sandwich). हेच नाही तर महागात महाग हाॅटेल ते रस्त्यावरील गाड्यावर देखील आपल्याला सहज सँडविच मिळते. सँडविचचे अनेक प्रकार बघायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून सतत सँडविचची मागणी वाढताना दिसतंय. त्याचे कारणही तेवढेच महत्वाचे आहे. आपण सहज कुठेही बसून, उभे राहून किंवा चालत चालत देखील सँडविच खाऊ शकतो. विशेष म्हणजे सँडविचमध्ये फार जास्त प्रमाणात कॅलरी नसतात. यामुळेच बरेच लोक सँडविच खाण्यावर भर देतात.
साधारणपणे एका सँडविचची किंमत फार तर फार 50-1000 पर्यंत असते. विशेष म्हणजे 25 रुपयांपासून देखील सँडविच मिळते. मात्र, सध्या एका सँडविचची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सँडविचची किंमत ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. 10 कोटी रुपयाचे एक सँडविच आहे. हैराण करणारे म्हणजे हे सँडविच उष्टे आहे.
या सँडविचची किंमत ऐकून लोकांना चांगलाच धक्का बसलाय. उष्टे सँडविच आणि तेही तब्बल ₹ 10 कोटी रुपयांचे हे सँडविच आहे. या सँडविचची विक्री देखील सुरू आहे. तुम्ही विचार कराल की, या सँडविचमध्ये असे काय खास आहे, ज्याची किंमत तब्बल 10 कोटी आहे. विशेष म्हणजे या सँडविचची विक्री ही फेसबुकवर होत आहे (half-eaten sandwich is up for sale for $1.3M on Facebook — and everyone is confused why).
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, इंग्लॅंडमध्ये राहणाऱ्या लीस्टर नावाच्या व्यक्तीने या सँडविचची विक्रीची पोस्ट शेअर केली. यासोबतच त्याने या सँडविचचा फोटो देखील शेअर केलाय. ग्रिल्ड, हे अर्धवट खाल्ले सँडविच आहे. यामध्ये चीज आणि थोडेसे मीट देखील आहे. हे सँडविच खूप क्रिस्पी असल्याचे सांगितले जातंय. मात्र, याची किंमत हैराण करणारी नक्कीच आहे. या सँडविचची विक्री करण्याचे खरे कारण म्हणजे ते सँडविच पूर्ण खाल्ले जात नाहीये. यामुळेच तो विक्री करत आहे. इतकी जास्त सँडविचची किंमत असल्याने हे सँडविच आता तूफान चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. आता या व्यक्तीची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून अनेकजण या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत.
half-eaten sandwich for sale 10 crore Facebook
half-eaten sandwich for sale 10 crore Facebook
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements