Election Commission defends unopposed election in Surat
- आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
- सुरत, इंदूर लोकसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध
General Elections 2024 : CEC Rajiv Kumar’s message to voters : लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून इंडिया आघाडी आणि एनडीएचे नेते अनेक दावे-प्रतिदावे करत आहेत. निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.
सुरत आणि इंदूर लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वच उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यानंतर त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक बिनविरोध झाली. यामुळे त्या ठिकाणी नोटा आणि उमेदवार यांच्यात लढत झाली पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया देशभरातून व्यक्त करण्यात आली होती. यासंदर्भात पत्रकार परिषदेत आयुक्त राजीव कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, आमची धारणा आहे की, सर्वच ठिकाणी मतदान झाले पाहिजे. परंतु निवडणुकीदरम्यान उमदेवार आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत असेल तर आम्ही काय करु शकतो? उमेदवारांनी स्वेच्छेने माघार घेतल्यामुळे आम्ही काहीच करु शकत नाही. परंतु उमेदवारावर कोणाचा दबाब असेल तर आम्ही काही भूमिका घेऊ शकतो, असे राजीव कुमार म्हणाले.
दरम्यान, इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आयोगाने निवडणूक काळात झालेल्या गोंधळावरून होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या ‘लापता जेंटलमैन वापस आ गए’ मीम्सवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिले आहे. आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो, असे उत्तर राजीव कुमार यांनी विरोधकांना दिले आहे. ऐन उन्हाच्या कडाक्यात निवडणुका झाल्याचेही आयोगाने मान्य केले. पुढील लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपविण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
EC defends unopposed election in Surat
EC defends unopposed election in Surat
EC defends unopposed election in Surat
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements