‘या’ कंपनीची जाहिरात चर्चेत
भारत-मालदीव वादामुळे मालदीवच्या पर्यटनाला फटका बसला आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांनी बुकिंग रद्द केल्याच्या निर्णयामुळे मालदीव अडचणीत सापडला आहे. या वादात आता भारतीय कंपनी EaseMy Tripची नवीन जाहिरात आणि तिची टॅगलाईन चर्चेत आहे. कंपनीची जाहिरात पाहिली तर त्यात ‘राष्ट्र प्रथम व्यवसाय नंतर’ असे स्पष्ट लिहिले आहे. हा वाद सुरू झाल्यानंतर, या कंपनीने सर्वप्रथम मालदीवमधील आपली सर्व बुकिंग रद्द करण्याचे मोठे पाऊल उचलले आणि चलो लक्षद्वीप मोहिमेअंतर्गत मोठ्या सवलतींची घोषणा केली (EaseMyTrip NATIONFIRST and BHARATFIRST).
“Nation First, Business Later”
EaseMy Trip च्या नवीन जाहिरातीत कंपनीने लिहिले की, भारतातील दुसरी सर्वात मोठी आणि देशांतर्गत कंपनी असल्याने आम्ही आमच्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी वचनबद्ध आहोत. भारत, तसेच देशातील नागरिक आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मालदीवच्या अनेक मंत्र्यांच्या टिप्पण्यांवर आम्ही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 8 जानेवारीपासून आम्ही मालदीवमधील सर्व प्रवासी बुकिंग अनिश्चित काळासाठी रद्द केल्या आहेत आणि आमच्यासाठी आमचा देश पैशांच्या आधी येतो.
कंपनीच्या जाहिरातीत भारतीय पर्यटन स्थळांचा उल्लेख करताना असे म्हटले आहे की, आम्हाला भारतातील आश्चर्यकारक आणि भव्य समुद्रकिनाऱ्यांचा खूप अभिमान आहे. आपल्या देशाला 7500 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे, ज्यामध्ये अंदमान, गोवा, केरळ तसेच लक्षद्वीपचा समावेश आहे. सोशल मीडियावरील तुमचा पाठिंबा हे आमच्या देशावरील प्रेमाचे उदाहरण आहे, चला या प्रवासात एकजूट राहू या… जय हिंद. भारत-मालदीव वादाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सोशल मीडियावर दोन ट्रेंड सुरू आहेत. पहिला #BoycottMaldives आणि दुसरा #CholoLakshdweep. या दरम्यान लक्षद्वीपला भेट देण्यासाठी कंपन्या अनेक प्रकारच्या ऑफर देत आहेत. ट्रॅव्हल कंपनी EaseMyTrip ने बुधवारी आपल्या ग्राहकांसाठी NATIONFIRST आणि BHARATFIRST हे डिस्काउंट कोड जाहीर केले आहेत.
India-Maldives row : EaseMyTrip offers discounts on NATIONFIRST and BHARATFIRST codes
EaseMyTrip NATIONFIRST and BHARATFIRST
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements