Karnataka Deputy CM DK Shivakumar Challenges Exit Poll Predictions
- ‘चाणक्य’ डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
- Lok Sabha Election Result 2024
- लोकसभा निवडणुकीचे उद्या निकाल येणार
- Exit polls will go wrong like they did during Assembly election
- Will Go Wrong : DK Shivakumar As Exit Polls Show NDA Ahead In Karnataka
लोकसभा निवडणुकीचे उद्या निकाल येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. देशात कोणाचे सरकार स्थापन होणार हे मंगळवारी 2 जून स्पष्ट होणार आहे. मात्र, निकालापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, निकालावरुन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी यावेळी इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, टीएमसी या विरोधी पक्षांचा समावेश आहे. काँग्रेसचे चाणक्य डीके शिवकुमार यांना एक्झिट पोलबाबत विचारले असता ते म्हणाले, इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल.
एक्झिट पोलचा अंदाज आले समोर : इंडियाला 295 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी संध्याकाळी वर्तविला होता. पण त्यापेक्षाही कमी जागा इंडिया आघाडीला मिळतील असा अंदाज पाच एक्झिट पोलनी वर्तविला आहे. 7 एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांची सरासरी काढली तर एनडीएला सरासरी 361 जागा मिळतील तर इंडिया आघाडीला 145 जागांवर समाधान मानावे लागेल असा निष्कर्ष निघतो.
भाजपला 311 जागा तर काँग्रेसला 63 जागा मिळतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला 52 जागांवर विजय मिळाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत एनडीएला 371 ते 401 जागा मिळण्याची शक्यता इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलने व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीला 109 ते 139 जागा जिंकता येतील. तर जन की बात या एक्झिट पोलने एनडीला 362 ते 392 व इंडिया आघाडीला 141 ते 161 जागा मिळतील असे म्हटले आहे. दैनिक भास्करने केलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 281 ते 350 व इंडिया आघाडीला 145 ते 201 जागा मिळतील असे म्हटले आहे.
DK Shivakumar Challenges Exit Poll
DK Shivakumar Challenges Exit Poll
DK Shivakumar Challenges Exit Poll
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements