Kempegowda International Airport
कर्नाटक—belgavkar : बंगळूर येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 7.76 कोटी रुपये किमतीचे हिरे आणि 4.62 लाख रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर आणि दिर्हाम चलन जप्त करण्यात आले. हवाई गुप्तचर संचालनालयाच्या (Directorate of Revenue Intelligence (DRI)) अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चिक्कबळ्ळापूरच्या 2 प्रवाशांना अटक केली आहे. या दोघांनी हे हिरे मुंबईहून बंगळूरला आणले होते आणि दुबईला नेत होते.
अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी दुबईला जाण्यासाठी तयार असलेल्या विमानाची पाहणी केली. त्यावेळी प्रवाशांच्या बॅगेतील चॉकलेट पॅकमध्ये लपवलेले हिरे सापडले. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तस्करीच्या जाळ्यातील आणखी दोन सदस्य हैदराबाद विमानतळावरून दुबईला आणखी हिरे घेऊन जात असल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांनी तत्काळ हैदराबाद गुप्तचर संचालनालयाला माहिती दिली. हैदराबाद विमानतळावरही 6.03 कोटी रुपयांचे हिरे आणि 9.83 लाख रुपयांचे अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले. हिरे तस्करीच्या जाळ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
Diamonds worth Rs 7 crore seized at Kempegowda International Airport Bengaluru Karnataka
Diamonds worth Rs 7 crore seized Airport Karnataka
Diamonds worth Rs 7 crore seized Airport Karnataka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements