क्रिकेट सामना सुरु असतानाच खेळाडूचा मृत्यू
तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांमधील घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक घटनांचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत (Viral Video). अशीच एक घटना क्रिकेटच्या मैदानात घडली आहे. मैदानात क्रिकेटचा सामना सुरु असताना एका तरुणाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे (Cricket Viral Video).
नोएडा येथे ही घटना घडली आहे. क्रिकेट सामना सुरु असतानाच एका खेळाडूचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने या तरुणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. विकास नेगी असे मृत तरुणाचे नाव आहे. इंजिनीअर असलेला विकास अवघा ३४ वर्षांचा होता. विकास हा मूळचा उत्तराखंडचा होता. तो सध्या दिल्लीतील रोहिणी येथे राहत होता. शनिवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर 135 मध्ये बनवलेल्या स्टेडियममध्ये क्रिकेटचा सामना सुरू होता. सामन्याच्या पहिल्या डावातच ही दुर्दैवी घटना घडली आहे.
व्हि़डोओतील दृष्यांनुसार विकास नेगी आणि दुसरा एक खेळाडू खेळपट्टीवर उपस्थित होते. समोरच्या खेळाडूने शॉट मारला आणि दुसऱ्या टोकाला उभा असलेला विकास धाव घेण्यासाठी धावला. चेंडू सीमारेषेपर्यंत गेल्याने दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर मधोमध काहीवेळ थांबले आणि परत माघारी फिरु लागले. विकास दुसऱ्या टोकाकडे जात असताना अचानक खेळपट्टीवर कोसळला. त्यानंतर सगळे खेळाडू त्यांच्याकडे धावले. इतर खेळाडूंनी लगेच विकासला सीपीआर दिला. नंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Please click here to Watch this Video or photo on X (Twitter)
Cricket Viral Video
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements