दिल्लीहून जयपूरला (राजस्थान) जाताना भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी चित्रा सिंह यांच्या गाडीचा अलवरमध्ये (राजस्थान) अपघात झाला. जसवंत सिंह यांची सून चित्रा सिंह यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. माजी खासदार मानवेंद्र सिंह हे त्यांच्या पत्नीसह भाजपा सोडून २०१८ मध्येच काँग्रेसमध्ये दाखल झाले. मानवेंद्र त्यांच्या मुलासह गंभीर जखमी झाले असून दोघांवर उपचार सुरू आहेत.
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर नौगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला, तर मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले. दोघांवर अलवर येथील सोलंकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मानवेंद्र सिंह यांच्या कारचा चालकही गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर बडोदामेव रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यालाही उपचारासाठी अलवर येथे रेफर करण्यात आले आहे. मानवेंद्र सिंग कार चालवत होते आणि त्यांच्या शेजारच्या सीटवर त्यांची पत्नी चित्रा सिंह बसली होती. मानवेंद्र यांचा मुलगा हमीर सिंग आणि चालक मागच्या सीटवर बसले होते.
बाडमेरचे माजी खासदार मानवेंद्र सिंह पत्नी चित्रा आणि मुलगा हमीर सिंह यांच्यासह दिल्लीहून जयपूरला जात होते. दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावरील 82.8 किमी रसगन आणि खुशपुरी दरम्यान, वाहनाचा अचानक तोल गेला आणि पुलाच्या भिंतीला धडकली. या अपघातात मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला. तर मानवेंद्र सिंह आणि त्यांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांनाही तत्काळ अलवर येथील सोलंकी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चित्रा सिंह यांचा मृतदेह राजीव गांधी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. तर मानवेंद्र सिंह, त्यांच्या मुलावर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
Congress leader Manvendra Singh Accident
Congress leader Manvendra Singh Accident
Congress leader Manvendra Singh Accident
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements