Chile forest fires kill 99
दक्षिण अमेरिकेतील चिली (Chile) येथील जंगलात लागलेली आग अद्यापही धुमसतच आहे (forest fires erupted in central Chile,m). या आगीत आतापर्यंत हजारो घरे जळून खाक झाली आहे. आगीच्या विळख्यात सापडल्याने 99 लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
सुमारे 10 लाख लोकसंख्या असलेल्या मध्य चिलीतील वालपरिसो प्रदेशातील अनेक भाग शनिवारी धुराच्या लोटाने व्यापले होते. अधिकाऱ्यांनी हजारो लोकांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले आहे. चिलीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विना डेल मार या किनारपट्टीवरील पर्यटन शहराच्या आसपासचे भाग प्रभावित झाले आहेत. सर्व बाधित भागात पोहोचण्यासाठी बचाव पथके धडपडत आहेत.
आगीबाबत माहिती देताना चिलीचे गृहमंत्री कॅरोलिना तोहा म्हणाले, की वालपरिसोमधील परिस्थिती सर्वात गंभीर आहे. रस्त्यांवरही जळालेल्या अवस्थेत लोकांचे मृतदेह सापडत आहेत. 2010 च्या भूकंपानंतर चिलीमधील ही सर्वात मोठी आपत्ती आहे. त्यावेळी भूकंपामुळे सुमारे 500 लोकांचा मृत्यू झाला होता.
चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी एका दूरचित्रवाणी भाषणात सांगितले की परिस्थिती सध्या खूपच कठीण आहे. सध्या ही आग 43 हजार हेक्टरवर पसरली आहे. सध्या आम्ही लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करतोय, आतापर्यंत अनेकांना आगीच्या विळख्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलंय. अहवालानुसार, चिलीच्या 92 जंगलात आग लागली आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे ही आग दाट लोकवस्तीच्या भागात पसरत आहे. त्यामुळे लोक, घरे आणि सुविधांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. चिलीमध्ये उन्हाळ्यात जंगलात आग लागणे सामान्य आहे. गेल्या वर्षी विक्रमी उष्णतेच्या वेळी लागलेल्या आगीत 27 लोकांचा मृत्यू झाला होता.
Chile forest fires kill 99
Chile forest fires kill 99
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements