बेळगाव—belgavkar : शाहनगर व सदाशिवनगर परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून लॅपटॉप व 600 ग्रॅम चांदी असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रमजान अब्दुल नदाफ (वय 19) व शाहीद शब्बीर शेख (वय 19, दोघेही रा. सत्यसाई कॉलनी, वैभवनगर) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सॅम्युअल महादेव नागनूर यांनी घरातून लॅपटॉप व दागिने चोरीला गेल्याची फिर्याद 26 जानेवारी रोजी दिली होती. याशिवाय सदाशिवनगरमधील डबल रोडवरील एका घरात चोरीची घटना घडली होती. या दोन्ही प्रकरणांची नोंद करुन घेत एपीएमसी पोलिसांनी तपास सुरु केला होता.
पोलिस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करत वरील दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर, किरण होनकट्टी, बी. के. मिटगार, व्ही. डी. बाबानगर, डी. सी. साग, बसवराज बानसे, कॅप्पाण्णा दोडमनी, गोविंदाप्पा पुजार, नामदेव लमाणी यांनी सहभाग घेतला.
Belgaum Robbery two arrested by APMC police belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Robbery two arrested by APMC police
Belgaum Robbery two arrested by APMC police
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310