बेळगाव—belgavkar : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरीव हालगा गावाजवळ माल वाहतूक ट्रकच्या धडकेत 22 मेंढ्या ठार आणि 15 मेंढ्या जखमी झाल्या आहेत. कुत्र्याच्या हल्ल्याला घाबरत मेंढ्या महामार्गावर धावत आल्या. या दरम्यान धारवाडहून बेळगावला येणाऱ्या माल वाहतूक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट मेंढ्यांच्या कळपात घुसले. याबाबत अनोळखी माल वाहतूक ट्रकचालक विरोधात बागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हालगा येथील राईस मिलजवळ घडलेल्या अपघातात सुमारे एक किलोमीटरपर्यंत मेंढ्या फरफटत गेल्याचे आणि काही ठिकाणी चाकाखाली मेंढ्या चिरडून जागीच मृत्यू पावल्या. पोलिसांनी घटनास्थळी सुरळीत वाहतुकीसाठी मार्ग करून दिला. जखमी मेंढ्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलविले. माल वाहतूक ट्रक (टीएन 88, यू 8807) चालक हालग्याहून बेळगावकडे येत होता. तर मेंढ्या रस्त्याच्या बाजूने जात असताना येथे कुत्र्यांने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे मेंढ्या घाबरून महामार्गावर दाखल आल्या. या दरम्यान हालग्याकडून बेळगावला येणाऱ्या माल वाहतूक ट्रकने मेंढ्यांना जोरात धडक दिली. मेंढ्या मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत रामा बिराप्पा पुजेरी (वय 38, रा. अबलजरी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) यांनी फिर्याद दिली.
Belgaum NH4 Halga Accident 22 Sheep Dies belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum NH4 Halga Accident 22 Sheep Dies
Belgaum NH4 Halga Accident 22 Sheep Dies
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310