मुंबईतील कंपनीने 21 लाखांची फसवणूक केली
बेळगाव—belgavkar : मुंबईतील कंपनीने 21 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वामन कृष्णराव माहुली (वय 78, रा. गणेशबाग, इंद्रप्रस्थनगर) यांनी टिळकवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद केली आहे. याप्रकरणी मुंबईतील तेजस एंटरप्राइजेस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, वामन यांच्या नावे ‘एस अँड एम ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी असून ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार ते होलसेल दरात साहित्य पुरवठा करतात.
गोवा येथील एका कंपनीने त्यांच्याकडे ‘कापूरदाणी विथ नाईट लॅम्प मटेरियल’ची ऑर्डर नोंदविली होती. कंपनीला 56 हजार नग आवश्यक होते. त्यानुसार वामन यांनी अहमदाबाद आणि गुजरात येथून काही नाईट लॅम्प खरेदी केले. तर मुंबई येथील तेजस एंटरप्राइजेस यांच्याकडे देखील त्यांनी आपली ऑर्डर नोंदविली होती. 144 रुपयांप्रमाणे 37,250 ‘कापूरदाणी विथ नाईट लॅम्प’ची ऑर्डर तेजस एंटरप्राइजेसने स्वीकारली. त्यानुसार 9 नोव्हेंबर 2022 ते 5 एप्रिल 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 39 लाख 12 हजार रुपये एवढी रक्कम तेजसच्या खात्याला वामन यांनी आपल्या बँक खात्यामधून आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे रक्कम अदा केली आहे.
या बदल्यात तेजस एंटरप्रायजेसकडून काही प्रमाणात ऑर्डर पाठवून देण्यात आली असून, 21 लाख 44 हजार 407 रुपयांची ऑर्डर पाठवून देण्यात आलेली नाही. वेळोवेळी ऑर्डरची मागणी करून देखील पाठविण्यात न आल्याने वामन यांनी पोलिस ठाण्यात तेजस एंटरप्राइजेसविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. टिळकवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद करून चौकशी हाती घेण्यात आली आहे.
Belgaum Mumbai Company Fraud ₹21 Lakhs belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum Mumbai Company Fraud ₹21 Lakhs
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements