बेळगाव—belgavkar : मुचंडी येथे समाजकंटकानी लावलेल्या आगीत 7 गवतगंज्या भक्षस्थानी पडल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मुतगा-मुचंडी संपर्क रस्त्यावरील रेल्वे फटकाजवळील शिवारामध्ये असलेल्या सात मोठ्या गवत गंज्यांना समाजकंटकांनी आग लावली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व गंज्या एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर होत्या. त्यामुळे ही आग समाजकंटकानीच लावली आहे, असा अंदाज शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. गवत गंज्यांना आग लावण्याची गावात ही पहिलीच घटना असल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यल्लाप्पा मुतगेकर, नागो कुंडेकर, कृष्णा कोनो, मारुती कोनो, शंकर मोटरे, बसू कोनो आणि गंगाधर हिरेमठ यांच्या सात मोठ्या गवत गंज्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.
आगीची घटना समजताच तातडीने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत सर्व गवतगंज्या जळून खाक झाल्या होत्या. घटनेनंतर ग्राम पंचायत अध्यक्ष लक्ष्मण बुडी, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संदीप जक्काने यांच्यासह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी रात्री मारिहाळ पोलिसांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. शुक्रवारी सकाळी संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर नुकसान किती झाले आहे ते स्पष्ट होणार आहे.
Belgaum Muchandi Fire 7 Paddy Grass Burned belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Muchandi Fire 7 Paddy Grass Burned
Belgaum Muchandi Fire 7 Paddy Grass Burned
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310