पण ती मतदारयादी निर्दोष असणार का?
बेळगाव—belgavkar Loksabha : बेळगाव जिल्ह्याची अंतिम मतदारयादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केली, पण ती मतदारयादी केवळ कन्नड भाषेतच आहे. मराठी भाषेतील मतदारयादी अद्याप तयार करण्यात आली नसल्याची माहिती निवडणूक विभागातून मिळाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघांत (बेळगाव, चिक्कोडी, कारवार) मोठ्या संख्येने मराठी मतदार आहेत. त्यामुळे मराठी मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात मराठी भाषेतील मतदारयादी उपलब्ध करून दिली जाणे आवश्यक असते.
बेळगाव शहरातील उत्तर व दक्षिण या मतदारसंघात मराठी संख्या मतदारांची जास्त आहे. येथे महापालिकेतील निवडणूक विभागाकडून मराठी मतदारयादी उपलब्ध करून दिली जाते, पण 22 जानेवारी रोजी जाहीर झालेली मतदारयादी अद्याप मराठीत उपलब्ध नसल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागातून देण्यात आली. मराठी भाषेतील मतदारयादी लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे निवडणूक विभागातून सांगण्यात आले. पण ती मतदारयादी निर्दोष असणार का? दरवेळी मराठी मतदारयादीत ज्या चुका असतात, त्या यावेळी टाळल्या जाणार का? याबाबत उत्सुकता आहे.
महापालिकेच्या 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत मराठी भाषेतील उमेदवारी अर्ज व मराठी भाषेतील मतदारयादीसाठी संघर्ष करावा लागला होता. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पाठपुरावा केला होता. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीही मराठी मतदारयादी मिळविण्यासाठी मराठी भाषिक उमेदवारांना सातत्याने पाठपुरावा करावा लागला होता. बेळगाव जिल्ह्यात दहाहून अधिक विधानसभा मतदारसंघात मराठी भाषिक मतदार आहेत. त्यामुळे मराठी भाषेतून मतदारयादी देणे आवश्यक असते. निवडणूक आयोगाकडूनही तसे निर्देश वेळोवेळी दिले आहेत. पण प्रत्येकवेळी मराठी भाषिकांना मराठी मतदारयादी मिळविण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. जिल्ह्याची अंतिम मतदारयादी 22 जानेवारी रोजी जाहीर केली. त्याचवेळी कन्नड व मराठी या दोन्ही भाषेतील मतदारयादी जाहीर होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. जिल्हा निवडणूक विभागाकडून केवळ कन्नड भाषेतील मतदारयादी जाहीर झाली.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारयादी जाहीर केली आहे. मराठीबहुल मतदार असलेल्या मतदारसंघांची मतदारयादी जाहीर करताना मराठीचा विचार होणे आवश्यक होते, पण तसे झालेले नाही. 2021 मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने 1 लाख 17 हजार मते मिळविली होती. यावेळीही समितीकडून उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास मराठी मतदारयादी मिळवावीच लागणार आहे.
Belgaum Loksabha Voters List in Kannada belgav belagavi belgavkar
explore digital india
belgavkar news | digital india
Belgaum Loksabha Voters List in Kannada
explore digital india | belgaum news
Belgaum Loksabha Voters List in Kannada
Belgaum Loksabha Voters List in Kannada
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements