काँग्रेसची संभाव्य उमेदवारांची यादी
चिदानंद सवदी यांचाही समावेश
बेळगाव—belgavkar : कर्नाटक राज्य काँग्रेसने लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. जिंकण्याच्या निकषावर राज्यातील २८ लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची यादी केली असून बेळगावातून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, कारवारमधून आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्यासह माजी आमदार अंजली निंबाळकर, निवेदित अल्वा, चिकोडीतून लक्ष्मण चिंगळे, चिदानंद सवदी, गजानन मंगसुळी यांच्या नावांचा समावेश आहे.
राज्यातील किमान २० लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळविण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केला आहे. यासाठी विजयाचे निकष लावून संभाव्य उमेदवारांची यादी अंतिम केली आहे. पालकमंत्री, जिल्ह्यातील नेते आणि पक्ष निरीक्षक यांच्याकडून संभाव्य उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये मागील लोकसभा निवडणुकीतील चुका टाळण्याचा प्रयत्न केला आहे. संभाव्य यादीतील उमेदवारांबाबत प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली. यादीबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह प्रमुख नेते चर्चा करणार आहेत. त्यांच्यानंतर अंतिम यादी मंजुरीसाठी अ. भा. काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात काँग्रेसच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत अंतिम उमेदवारांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार
बेळगाव : मृणाल हेब्बाळकर, गिरीश सोनवालकर, विनय नवलगट्टी
चिकोडी : लक्ष्मण चिंगळे, चिदानंद सवदी, गजानन मंगसुळी
कारवार : आमदार आर. व्ही. देशपांडे, माजी आमदार अंजली निंबाळकर, निवेदित अल्वा
बागलकोट : वीणा काशपण्णावर, प्रकाश तपशेट्टी, अजयकुमार सरनायक
बिदर : मंत्री ईश्वर खंड्रे, राजशेखर पाटील हुमनाबाद, बसवराज बुळ्ळा
धारवाड : शिवलिला विनय कुलकर्णी, रजत उळ्ळागडीमठ, मोहन लिंबीकाई हावेरी
गदग सलीम अहमद, आनंद गड्डदेवरमठ, सोमण्णा बेवीनमरद
कोप्पळ : राजशेखर हिटनाळ, बसनगौड बादर्ली, अमरेगौड बय्यापूर
बळ्ळारी : व्ही. एस. उग्रप्पा, पान 2 वरवेंकटेश प्रसाद, गुज्जल नागराज
चित्रदुर्ग : बी. एन. चंद्रप्पा, एच. अंजनेय, जी. एस. मंजुनाथ दावनगेरी प्रभा मल्लिकार्जुन, मुंजप्पा, विनयकुमार
गुलबर्गा : रवी पाटील, देवण्णा वकील, कुमार नायक
बंगळूर : तब्बू दिनेश गुंडूराव, बी. के. हरिप्रसाद, मोहम्मद नलपाड हॅरीस
बंगळूर उत्तर : कुसुमा हनुमंतराप्पा, प्रा. राजीव गौड
बंगळूर दक्षिण : सौम्या रामलिंगारेड्डी
बंगळूर ग्रामीण : डी. के. सुरेश मंगळूर : मिथुन रै, रमानाथ रै
उडपी-चिकमंगळूर : सुधीरकुमार मुरळी, आरती कृष्ण, डॉ. के. पी. अंशुमंत
चामराजनगर : बोस महादेवप्पा, एम. शिवण्णा
हासन बिरुरु देवराजू, श्रेयस पटेल, शिवलिंगेगौड
मंड्या : स्टार चंद्र, रम्या दिव्यस्पंदन
म्हैसूर-कोडगू : यतिंद्र सिद्धरामय्या, लक्ष्मण
शिमोगा गीता शिवराजकुमार
विजापूर : प्रकाश राठोड, शांता नायक, देवानंद चौहाण
तुमकूर : एस. पी. मुद्दहनुमेगौडा, के. एन. राजण्णा
कोलार : के. एच. मुनीयप्पा, सी. एम. मुनीयप्पा, चिक्क पेद्दण्णा
चिकबळ्ळापूर : वीराप्पा मोईली, रक्षा रामय्या, शिवकुमार रेड्डी
Belgaum Loksabha Election Mrunal Hebbalkar belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Loksabha Election Mrunal Hebbalkar. Belgaum Loksabha Election Mrunal Hebbalkar
Belgaum Loksabha Election Mrunal Hebbalkar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements