Karnataka government tables bill mandating 60% Kannada on signboards
बेळगाव—belgavkar : बंगळूर : कर्नाटक राज्यातील दुकाने, उद्योग-व्यवसायांच्या पाट्यांवर कन्नडमधून 60 टक्के जागेत अक्षरे लिहिणे अनिवार्य करण्यासाठीच्या पार्श्वभूमीवर कन्नड भाषा सर्वसमावेशक विकास (सुधारणा) विधेयक – 2024 विधानसभेत सादर करण्यात आले (Karnataka introduces Bill to make 60% Kannada compulsory on all name boards). या संदर्भात जारी करण्यात आलेला वटहुकूम माघारी पाठवून विधिमंडळात विधेयक मंजूर करण्याची सूचना राज्यपालांनी सरकारला केली होती. दरम्यान, कन्नडमध्ये पाट्या लावण्याबाबत टास्क फोर्स तयार करण्याचा विचार सरकार करत आहे.
कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्यावतीने मंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी हे विधेयक सादर केले. विधेयकानुसार व्यावसायिक उद्योग, दुकाने, ट्रस्ट, समुपदेशन केंद्र, रुग्णालय, प्रयोगशाळा, मनोरंजन केंद्र, हॉटेल यांच्या पाट्यांवर 60 टक्के जागेत कन्नड अक्षरे अनिवार्य होणार आहे. कन्नड समर्थक संघटनांनी पाट्यांवर कन्नड भाषेत अक्षरे लिहिण्याचे अनिवार्य करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. कन्नड संघटनांच्या दबावाला बळी पडून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाट्यांवर कन्नडला 60 टक्के जागा व इतर भाषांना 40 टक्के जागा देण्याचा कन्नडसक्ती कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भात सरकारने वटहुकूम काढला होता. मात्र, राज्यपालांनी वटहुकूमाला मंजुरी न देता तो परत पाठवला. या पार्श्वभूमीवर कायदा करण्यासाठी विधेयक मांडण्यात आले आहे.
Belgaum Karnataka Bill Kannada compulsory on name boards belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Karnataka Bill Kannada compulsory on name boards
Belgaum Karnataka Bill Kannada compulsory on name boards
Belgaum Karnataka Bill Kannada compulsory on name boards
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310