बेळगाव—belgavkar : इ. स. 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. त्यापूर्वी इ. स. 1673 मध्ये दक्षिण प्रांतात राजकीय परिस्थिती फारच बिघडलेली होती हे पुढील उताऱ्यावरून कळून येईल. दक्षिण प्रांती आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही ही पराक्रमी संस्थाने तसेच मोंगल सुभा एक एक लक्ष स्वारांचा. या विरहित गोवेकर फिरंगी, इंग्रज, बलंदेज, रामनगरकर, पाळेगार, सौदे बिदनूर असे जागजागां अनेक पुंड माजले तरी त्यांचा बंदोबस्त आवश्यक! म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणची मोहीम हाती घेतली होती. बेळगांव-शहापूर घेऊन ते हुबळीस गेले. (जाता जाता त्यांनी येथून खूप संपत्ती संपादन केली.) बेळगांव आणि बेळगांव सभोवतालचा टापू आपल्या कह्यात कायम राहावा म्हणून छ. शिवाजी महाराजांनी अनेक लहान मोठी गडकोट ठाणी बांधली. पारगड, भीमगड, वल्लभगड, राजहंसगड, महिपाळगड, कलानंदीगड, पवित्रगड, परसगड, हे सर्व गड त्यापैकीच होत.
इ. स. 1674 मध्ये फोंडा घाट मार्गे गोव्यावर स्वारी करण्यास जात असताना छ. संभाजी महाराज यांचा एक रात्र मुक्काम बेळगांव शहरातील शंभू जत्ती मंदिरात होता. तेव्हा तेथे जंगल होते आणि देवालयही लहान कौलारू छप्पर असलेले होते. इ. स. 1686 मध्ये छ. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीतच दिल्लीच्या औरंगजेब बादशहाने दक्षिणेला स्वारी सुरू केली. औरंगजेबाचा दुसरा मुलगा अझमशहा याने मराठ्यांचा पराभव करून बेळगांव किल्ला घेतला आणि विजापूरची आदिलशाही पूर्णपणे बुडविली. त्याच्यामुळे काही काळ बेळगांवला ‘अझम नगर’ हे नाव प्राप्त झाले. बेळगांवचा किल्लेदार म्हणून मुस्ताफा नावाच्या माणसाची नेमणूक झाली. त्याने किल्ल्यापुरत्याच भागाला ‘मुस्ताफाबाद’ हे नाव देण्याचा प्रयत्न केला पण तो फसला आणि पुन्हा बेळगांवचे नाव बेळगांव हेच राहिले.
हेही वाचा : बेळगाव : कहाणी बेळगांव नगरीची | बेळगांव आणि परिसर भौगोलिक दर्शन – भाग 1
हेही वाचा : बेळगांवचा रोमांचक इतिहास – भाग 2
इ. स. 1695 मध्ये एक इटालियन प्रवासी फिरत फिरत बेळगांवला आला होता. जमेली कॅरेरी हे त्याचे नाव. बेळगांवची व्यापारी पेठ व किल्ला पाहून त्याने आपल्या डायरीत जी नोंद केली आहे ती अशी ‘दगडांनी बांधलेला हा किल्ला विस्ताराने फार मोठा आहे. जागजागी बुरुज ठेवून तटबंदी मजबूत केलेली आहे. तटाबाहेर पाण्याने भरलेला खोल व रुंद असा खंदक आहे. मात्र किल्ल्याच्या विस्ताराच्या मानाने तोफांचे संरक्षण फारच कमी वाटते. ही एका विदेशी पर्यटकाची लष्करी दृष्टी विशेष कौतुकास्पद नव्हे काय? प्रवासी तर राहोच पण इकडील एखाद्या तरी राजकारण्याने अशी लष्करी दृष्टी ठेऊन राजकारण केले आहे असे उदाहरण अगदी क्वचित आढळेल. चुकून एखादाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा राजा आपल्या इतिहासात आढळू शकेल…! म्हणूनच कवी परमानंदानं त्यांना ‘गडकोटचे अधिश्वर’ म्हटलंय. त्या इटालियन प्रवाशाला त्याच्या देशातील द्राक्षाप्रमाणे इथं बेळगांव शहरात गोड, रुचकर व भारी किंमतीची द्राक्षे खायला मिळाली याची नोंद त्याने आपल्या डायरीत अगदी आवर्जून केली आहे. त्यावेळी येथील व्यापारी भरभराटीत होता. इथून त्याला गोव्याला जायचे होते. म्हणून हा प्रवासी शहापूरच्या गोवा वेशीतील लमाणांच्या व्यापारी तांड्याबरोबर बैलावर बसून जांबोटी मार्गे गोव्यास गेला.
इ. स. 1719 मध्ये साताऱ्याचे छत्रपती शाहूमहाराज यांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी सैन्यासह दिल्लीस जाऊन बादशहाला मदत केली. तेव्हां बादशहाने त्यांच्याकडे महाराष्ट्रातील मराठ्यांच्या स्वराज्याची सनद व दक्षिणेतील मोंगली मुलुखाचे चौथाई व सरदेशमुखी वसुलीचे हक्क लिहून दिले. म्हणून साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांना बेळगांवच्या चौथाई व सरदेशमुखी वसुलीचे हक्क मिळाले. या हक्कानुसार खंडणी वसुलीसाठी छत्रपतींनी अक्कलकोटचे राजे फत्तेसिंग भोसले यांची नेमणूक केली. इ. स. 1720 साली बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा मृत्यु झाला. ही संधी साधून हैद्राबादच्या निजाम उल्मुल्काने बेळगांवचा किल्ला व अथणी परगणा आपल्या हाती घेतला. त्यानंतर पुन्हां इ. स. 1756 साली पेशव्यांनी बेळगांवचा किल्ला आपल्या अंमलाखाली आणला. मग तेव्हापासून इ. स. 1818 पर्यंत किल्ला पेशव्यांच्याच हाती राहिला. पेशव्यांनी हा किल्ला व त्याच्या भोवतीचा चाळीस हजार उत्पन्नाचा भूप्रदेश यावर देखरेख करण्यासाठी सदाशिव पंडित यांची नेमणूक केली. इ. स. 1818 मध्ये पेशव्यांच्या बरोबर लढाई करून इंग्रजांना हा किल्ला मिळवावा लागला. ही लढाई तीन आठवडे चालली होती. बेळगांव किल्ला व शहर जिंकल्यानंतर इंग्रजांनी त्याचा समावेश प्रथम धारवाड जिल्ह्यात केला पण नंतर या शहराचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन इ. स. 1836 ते 1838 या दोन वर्षात बेळगांव हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण करून त्याचा एक स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला.
इ. स. 1858 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच्या हातीच सर्व राज्यकारभार होता. कंपनी सरकारची सत्ता होती. तेवढ्या अवधीत तिने येथे काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या त्या अशा – इ. स. 1848 साली येथील कलेक्टर इन्विराईटी याने नेटिव्ह जनरल लायब्ररी म्हणून नगर वाचनालय स्थापन केले. सुरवातीस 85 वर्गणीदार होते. या वाचनालयात इंग्रजी, मराठी व गुजराथी अशी 13 वर्तमानपत्रे वाचावयास मिळत होती. अभ्यासू वाचकांसाठी 1036 पुस्तके होती. इ. स. 1851 मध्ये बेळगांव नगरपालिका स्थापन झाली. तिचे घरपट्टीचे उत्पन्न तेव्हां 408 रु. होते. इ. स. 1852 मध्ये बेळगांवची पहिली खानेसुमारी झाली. त्यावेळी शहर, लष्कर व शहापूर यासकट एकूण लोकसंख्या सुमारे तीस हजार होती. इ. स. 1858 नंतर ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा कारभार संपुष्टात येऊन येथे इंग्लंडच्या ब्रिटीश सरकारचा कारभार सुरू झाला. तेव्हा बेळगांव जिल्ह्याचा समावेश मुंबई इलाख्यात करण्यात आला. इ. स. 1947 साली ब्रिटिश सरकारची हिंदुस्थानातील सत्ताच संपुष्टात आली. तरीसुद्धा सन 1956 पर्यंत बेळगांव जिल्हा मुंबई इलाख्यातच राहिला. (राज्यांच्या फेर रचनेनंतर या जिल्ह्याचा समावेश कर्नाटकात करण्यात आला.)
Belgaum History Shivaji Maharaj Peshwai Forts belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum History Shivaji Maharaj Peshwai Forts
Belgaum History Shivaji Maharaj Peshwai Forts
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements