बेळगाव—belgavkar : भरदिवसा घर फोडून 10 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी गौंडवाडमध्ये (ता. बेळगाव) उघडकीस आली. चोरीच्या दागिन्यांची किंमत सुमारे ₹ 6 लाख रुपये होते. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गोंडवाडमध्ये जयश्री महादेव तळवार यांचे घर आहे. पती-पत्नी दोघेही शिक्षक असल्याने ते दोघे नेहमीप्रमाणे शाळेला गेले होते. त्यांचे सासू-सासरेही हॉस्पिटलला गेले होते.
दुपारी 11 ते 12 या वेळेत चोरट्यांनी घराचे समोरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने लांबवले. त्यात गंठण, मंगळसूत्र, कर्णफुले यासह अन्य दागिन्यांचा समावेश आहे. 12 वाजता कुटुंबीय घरी आले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.
घटनेची माहिती मिळताच काकती पोलिस ठाण्याचे निरीक्षक मृत्युंजय मठद व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना प्राचारण करण्यात आले. परंतु, चोरट्यांचा माग निघाला नाही. ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून घर बंद करुन जाताना मालकांनी सतर्कता बाळगावी. दिवसा बाहेर जात असल्यास शेजाऱ्यांना माहिती द्यावी. घर बंद करुन जायचे असल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन काकती पोलिसांनी केले आहे.
Belgaum Goundwad Teacher House Robbery belgav belagavi belgavkar
belgavkar news
belgaum news
Belgaum Goundwad Teacher House Robbery
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements