बस प्रवास ऑनलाईन पेमेंटवर
युपीआय पेमेंटद्वारे तिकिटाचे पैसे
बेळगाव—belgavkar : बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रत्येक शहरच नाही तर गावही जोडले गेले आहे. ग्रामीण भागात एसटीचा मोठा आधार प्रवाशांना आहे. आता परिवहन महामंडळ काळाप्रमाणे बदलत आहे. नवीन नवीन सुविधा एसटीत दिल्या जात आहे. आता महामंडळ डिजिटल सुद्धा झाले आहे. म्हणजेच तुमच्या खिशात पैसे नसताना एसटीने प्रवास करत येणार आहे. एसटीने तिकिटासाठीही ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे सुट्या पैशांची कटकट संपणार आहे.
ऑनलाईनचा जमाना आला आहे. खिशात पैसे नसताना खरेदी करता येते. खिशात पैसे नसताना रेल्वे प्रवास किंवा खासगी बसने प्रवास करत येतो. आता महामंडळानेही ही सुविधा दिली आहे. बसमध्ये आता क्यूआर कोडची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामुळे ऑनलाईन तिकीट काढून बस प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी परिवहनने कॅशलेस ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. या नव्या UPI प्रणालीला मंगळवारी बेळगाव बसस्थानकात चालना देण्यात आली. विभागीय नियंत्रक गणेश राठोड, डीटीओ के. के. लमाणी व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नव्या प्रणालीला प्रारंभ करण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर बेळगाव आगारात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत सर्वच बसेसमध्ये ही नवीन प्रणाली सुरू होणार आहे. या नवीन प्रणालीमुळे प्रवासी क्युआरकोड स्कॅन करून युपीआय पेमेंटद्वारे तिकिटाचे पैसे अदा करू शकतात. त्यामुळे आता खिशात सुटे पैसे आहेत की नाहीत याची चिंता करण्याची गरज नाही.
तिकीट रक्कम अदा करण्यासाठी प्रवाशांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पेमेंट अॅपचा वापर करता येणार आहे. त्यानुसार फोन पे, गुगल पे सारख्या सर्व युपीआय पेमेंटसाठी वाहकाकडे (कंडक्टर) अँड्रॉईड तिकीट मशीन दिली जाणार आहे. परिवहनचा प्रवास ऑनलाईन व्हावा यासाठी परिवहनने डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदीचा पर्याय उपलब्ध केला आहे. या नव्या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशाऐवजी युपीआय, क्युआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करून तिकीट काढता येणार आहे.
यापूर्वी हुबळी आगारात प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्याठिकाणी प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बेळगाव आगारातही नवीन प्रणाली सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना गुगल पे व फोन पेद्वारे तिकीट काढता येणार आहे. बेळगाव आगारात नव्या डिजिटल पेमेंट प्रणालीला प्रारंभ करण्यात आला आहे. बसच्या कंडक्टरकडे नवीन अँड्रॉईड मशीन देण्यात आली आहे. या मशीनला स्कॅन करून प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे. गुगल पे, फोन पे आदी डिजिटल पेमेंटचा वापर करता येणार आहे.
– गणेश राठोड (विभागीय नियंत्रक)
Belgaum Bus Ticket Online Payment belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Bus Ticket Online Payment
Belgaum Bus Ticket Online Payment
Belgaum Bus Ticket Online Payment
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements