आजी-नातवानंतर आजोबांचाही मृत्यू
बेळगाव—belgavkar : गॅस सिलिंडरमधील गळतीमुळे आगीचा भडका उडून भाजून गंभीर जखमी झालेल्या 5 जणांपैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. गॅस गळतीमुळे भाजून जखमीपैकी गोपाळकृष्ण सीताराम भट (वय 84, बसवाण गल्ली, बेळगाव) यांचा बुधवारी मृत्यू झाला. हेमंत मोहन भट (वय 27), कमलाक्षी गोपालकृष्ण भट (वय 76, सर्व रा. बसवाण गल्ली, बेळगाव) अशी मयतांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले, बसवाण गल्ली येथील अपार्टमेंटमध्ये रविवारी दुपारी गॅस गळतीची दुर्घटना घडली. त्यात 5 जण गंभीर जखमी झाले. पैकी कमलाक्षी भट आणि हेमंत भट यांचा सोमवारी मृत्यू झाला. गोपाळकृष्ण भट आणि ललिता मोहन भट (वय 48) यांच्यावर तीन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी गोपाळकृष्ण भट यांचा मृत्यू झाला. यामुळे या दुर्घटनेत एकूण तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर ललिता भट यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोहन गोपालकृष्ण भट (वय 46) हे किरकोळ जखमी झाले होते (बेळगाव : बसवाण गल्ली गॅस दुर्घटना, 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू).
गॅस सिलिंडर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी बसवाण गल्ली येथील एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले होते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून सर्व जखमींना खासगी इस्पितळात हलविण्यात आले होते. मोहन वगळता इतर चौघे जण 90 टक्क्यांहून अधिक भाजून जखमी झाले आहेत. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.
Belgaum Baswan Galli Gas Leakage three dies belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Baswan Galli Gas Leakage three dies
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310