बेळगाव—belgavkar : झाडावरुन नारळ काढताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी बहाद्दरवाडीत घडली. परशुराम रामा होनगेकर (वय 44, रा. संतीबस्तवाड) असे मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, परशुराम हा बुधवारी दुपारी बहाद्दरवाडीत 20 फूट उंचीच्या झाडावरील नारळ काढत होता.
पाय घसरल्याने व तोल गेल्याने तो झाडाजवळील 80 फूट खोल विहिरीत पडल्याने जागीच ठार झाला. या विहिरीत सुमारे 10 फुटांपर्यंत पाणी आहे. परंतु, विहिरीत पडताना तिथे असलेले लोखंडी अँगल त्याच्या डोक्याला आदळले. त्यामुळे, गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक श्वेता व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून उपनिरीक्षक श्वेता अधिक तपास करीत आहेत.
Belgaum Bahaddarwadi dies fallen from Coconut tree belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Bahaddarwadi dies fallen from Coconut tree
Belgaum Bahaddarwadi dies fallen from Coconut tree
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310