CCPA च्या नोटीसनंतर झाली कारवाई
Ayodhya Ram Mandir Prasad
Notice to Amazon for selling sweets as Ayodhya Ram Temple’s prasad : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची आतुरता जगभरातील श्रीराम भक्तांना लागून आहे. एकीकडे संपूर्ण देश या भव्य सोहळ्यासाठी सज्ज झालेला असतानाच, राम मंदिराच्या नावावर फसवणूकीचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर देखील स्कॅमर्सचा सुळसुळाट झाला होता (Amazon gets government notice over products listed as ‘Ram Mandir prasad’)
“अयोध्येतील राम मंदिरातील प्रसाद” अशा नावाने अमेझॉनवर मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री सुरू होती (Ayodhya Ram Mandir Prasad). अमेझॉन किंवा कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाईटवरुन आपण प्रसादाची विक्री करत नसल्याचं अयोध्या राम जन्मभूमी ट्रस्टने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सेंट्रल कंझ्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटीने (CCPA) याबाबत अमेझॉनला नोटीस जारी केली होती.
यानंतर आता अमेझॉनने अशा प्रकारची उत्पादने आपल्या वेबसाईटवरुन हटवली आहेत. तसंच, अशा विक्रेत्यांविरोधात कारवाई देखील करण्यास अमेझॉनने सुरुवात केली आहे. अशा प्रकारची दिशाभूल करणारी उत्पादने आता अमेझॉनवर दिसणार नाहीत असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. राम मंदिराच्या नावाने आणखीही बऱ्याच प्रकारचे स्कॅम सध्या सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा व्हीआयपी पास मिळवण्यासाठी अॅप डाऊनलोड करा, अशा प्रकारचा मेसेजही व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. या अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये व्हायरस किंवा मालवेअर इन्स्टॉल करुन, फोन हॅक होऊ शकतो.
क्यूआर कोड स्कॅम : यासोबतच, कित्येक नागरिकांना राम जन्मभूमी ट्रस्टच्या नावाने क्यूआर कोड पाठवून, पैसे दान करण्यास सांगण्यात येत आहे. अशा प्रकारचं कोणतंही डोनेशन अभियान आपण राबवत नसल्याचं ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याला बळी न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
Ayodhya Ram Mandir Prasad
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements