टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-वडील झाले. अनुष्काने 15 फेब्रुवारीला मुलगा अकायला जन्म दिला. वैयक्तिक कारण सांगून विराटने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून BCCI कडे ब्रेक मागितला होता. मंगळवारी विराट आणि अनुष्काने सोशल मीडियावर घोषणा केली की वामिकाचा धाकटा भाऊ अकाय या जगात दाखल झाला आहे. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे, की लंडनमध्ये जन्मलेला अकायला ब्रिटिश नागरिकत्व मिळेल का?
विराट कोहली व अनुष्का शर्मा यांना 3 वर्षांची मुलगी आहे आणि वामिका असे तिचे नाव आहे. अकायच्या जन्माची बातमी देताना विराटने पोस्टे लिहिली की, ‘आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा मुलगा याचे स्वागत केले. वामिकाच्या धाकट्या भावाचे या जगात स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करा. धन्यवाद.’ विराटची पत्नी अनुष्काने लंडनच्या रुग्णालयात अकायला जन्म दिला. त्यामुळे आता अनेकांना प्रश्न पडलाय की, अकाय ब्रिटिश नागरिक आहे का?
एखाद्या मुलाचा जन्म ब्रिटनमध्ये झाला असला तरी त्याला ब्रिटिश नागरिक म्हटले जात नाही. त्याच्या पालकांपैकी एक ब्रिटिश नागरिक असेल किंवा त्यांनी तेथे दीर्घकाळ राहून स्थायिक दर्जा प्राप्त केला असेल तरच तो ब्रिटिश नागरिक होऊ शकतो. मुलाचे पालक ब्रिटीश नागरिक असतील आणि जर मुलाचा जन्म यूकेच्या बाहेर झाला असला तरी तो ब्रिटिश नागरिक होऊ शकतो. विराट कोहली आणि अनुष्काने लंडनमध्ये घरही विकत घेतले आहे, पण असे असूनही अकाय ब्रिटिश नागरिक होऊ शकत नाही. अकायचा पासपोर्ट यूकेमध्येच बनवला जाणार असला तरी त्याला भारतीय नागरिक म्हटले जाईल.
Anushka Sharma-Virat Kohli baby boy Akaay
Anushka Sharma-Virat Kohli baby boy Akaay
Anushka Sharma-Virat Kohli baby boy Akaay
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements