भारतीय हवाई दलाचे हॉक ट्रेनर विमान पश्चिम बंगालच्या कलाईकुंडा एअरबेसजवळ दुर्घटनाग्रस्त झाले आहे. विमानात असलेले दोन पायलट सुरक्षित बाहेर निघाले आहेत. शेतात कोसळल्याने विमानावर चिखलाचे अस्तर पसरले होते. हवाई दलाने विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीचे गठन केले आहे. तांत्रिक बिघाड किंवा मानवीय त्रुटी आहे का याचे कारण ही समिती शोधणार आहे (Air Force Trainer Hawk Aircraft Crashes In West Bengal, aircraft crashes at Kalaikunda airbase in Bengal)
पायलटनी पॅराशूटच्या मदतीने उडी मारून जीव वाचविले आहेत. दुपारी साडे तीन वाजता हा अपघात घडला. भातशेतीमध्ये हे विमान कोसळले आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. हवाई दलाचे अधिकारी हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचले आहेत.
सोमवारी संकरेल ब्लॉकच्या केश्यापाटा भागातील भातशेतीत बॉम्ब पडला होता. लक्ष्यापासून भटकून हा बॉम्ब तिथे पडल्याचे हवाई दलाने म्हटले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी विमान अपघात झाला आहे.
Air Force Trainer Hawk Aircraft Crashes
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements