धक्कादायक बाब म्हणजे, या मुलाचे वडील
7-year-old boy throws puppy from 20 feet in Noida
भटक्या कुत्र्यांचा मुद्दा वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असतो. नोयडा येथील एका सोसायटीत एक 7 वर्षांचा मुलगा भटक्या कुत्र्याच्या पिल्लाला इमारतीवरून 20 फूट खाली फेकतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे (7-year-old boy throws puppy from 20 feet in Noida). बाब म्हणजे, या मुलाचे वडील जवळ उभं राहून हा सगळा प्रकार पाहाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. इतकेच नाही तर कुत्र्याच्या पिल्लाला फेकतानाचा व्हिडीओ त्या मुलाच्या वडिलांनीच काढला असून त्यांनीच तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2 फेब्रुवारी रोजी नोयडाच्या 14th अव्हेन्यू सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणात सात वर्षीय मुलाच्या इंजिनीयर असलेल्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिपल फॉर ॲनिमल्स संस्थेच्या सुरभी रावत यांनी शनिवारी बिसराख पोलिस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीवरून वडिलांविरुद्ध विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. त्याच्यावर IPC कलम 429 आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
वडिलांनी आधी व्हिडीओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यांनी मुलाला थांबवायला हवं होतं. हा त्यांचा निष्काळजीपणा केला. ते म्हणाले की, त्यांचे मूल कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळत होते आणि खेळत असताना त्यांने पिल्लाला उंचावरून फेकून दिले, अशी माहिती बिसरख पोलिस स्टेशनच्या एसएचओनी दिली. व्हिडीओमध्ये मुलगा कुत्र्याच्या पिल्लाला झाडीमधून उचलून घेतो, यावेळी कुत्रा हातातून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसतं. बाजूला दुसरी कुत्री भुंकताना देखील ऐकू येत आहे. त्यानंतर हे मुल इमारतीच्या कठड्याकडे जातं आणि तेथून त्या पिल्लाला खाली फेकून देतं.
प्राण्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे म्हणणे आहे की कुत्र्याचे पिल्लू जाग्यावरच ठार झालं, तर या सोसायटीमधील लोक ते बचावल्याचे सांगत आहेत. यातच पोलिसांनी कुत्र्याचा मृतदेह मिळाला नसल्याचे सांगितलं.
बच्चे ने एक पिल्ले को गोद में उठाया और नीचे फेंक दिया। Video ग्रेटर नोएडा में 14 एवेन्यू गौर सिटी-2 की है। नोएडा-गाजियाबाद की सोसाइटीज में आजकल स्ट्रीट डॉग्स को लेकर गृहयुद्ध जैसे हालात बने हुए हैं। pic.twitter.com/iU7PCTTwuZ
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) February 2, 2024
रविवारी, बातमी पसरताच, 14 एव्हेन्यू सोसायटीमधील अनेक रहिवाशांनी याचा निषेध करण्यास सुरुवात केली. तसेच भटक्या कुत्र्यांना सोसायटीबाहेर हलविण्याचा प्रयत्न देखील केला. दरम्यान सोसायटीत भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्या प्रियंका यांनी त्यांना असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही महिलांनी त्यांना मारहाण केल्याचा प्रकार देखील घडला .या घटनेचा दुसरा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने त्यांना थप्पड देखील मारली, असे सोसायटीतील दुसऱ्या एका कुत्र्यांना खाऊ खालणाऱ्या व्यक्तीने सांगितलं.
7-year-old boy throws puppy from 20 feet in Noida
7-year-old boy throws puppy from 20 feet in Noida
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements