फलकांवर 60 टक्के मजकूर कन्नड आणि…
बेळगाव—belgavkar : दुकाने, आस्थापनांवरील फलकांवर 60 टक्के मजकूर कन्नड आणि 40 टक्के मजकूर इतर भाषांमध्ये असावा, असा नवा नियम जारी करण्यात येणार आहे. याबाबत अध्यादेश जारी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याद्वारे पुन्हा एकदा कन्नडसक्तीचा वरवंटा फिरवला जाणार आहे (60% Kannada on signboards in Karnataka).
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत फलकांचा विषय चर्चेला आला. त्यावेळी आधीचा नियम आणि नव्या नियमाविषयी चर्चा करण्यात आली. याआधी फलकांवर 50 टक्के मजकूर कन्नड आणि 50 टक्के मजकूर इतर भाषांमध्ये असावा असा नियम होता. या नियमांत दुरुस्ती करून इतर भाषांचे प्रमाण 20 टक्के कमी करण्यात आले आहे. कन्नड भाषा सर्वांगीण विकास (दुरुस्ती) विधेयक 2024 ला मंत्रिमंडळाने अनुमोदन दिले आहे. याद्वारे नवा नियम अस्तित्वात येणार आहे.
बेळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी अनेक वर्षांपासून मराठी, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तमिळ अशा विविध भाषांतील फलक लावले जातात. स्थानिक ग्राहकांना तत्काळ लक्षात यावे, याचा विचार करुन व्यापारी, दुकानदार फलक बनवून घेतात. पण, शासनाकडून प्रत्येक क्षेत्रात कन्नडसक्ती करण्यात येत आहे. याचा फटका आता दुकानदार, व्यापारी, उद्योजकांनाही बसत आहे. आता नव्या नियमामुळे अधिकाधिक कन्नड मजकूर असणारा फलक लावावा लागणार आहे.
60% Kannada on signboards in Karnataka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements