Ayodhya Ram Mandir : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी कारवाई
अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशातच यासोहळ्याआधी उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी शाखेने (ATS) मोठी कारवाई केली आहे. एटीएसने तीन संशयितांना अटक केली आहे.
तिन्ही संशयित सुखा डंके, अर्श डल्ला टोळीचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्श डल्लाच्या टोळीला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. सध्या एटीएसकडून संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणांपैकी दोन तरुण राजस्थानमधील सीकर भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय एटीएसचे जवानही तैनात आहेत. सर्व सैनिकांकडे आधुनिक शस्त्रेही आहेत. यासोबतच पोलीस आणि सुरक्षा दलाच्या नजरेतून कोणीही सुटू नये यासाठी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सरयू नदी आणि घाटांवर एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. अयोध्येत दाखल होणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेसाठी बार कोडिंगचा वापर केला जात आहे. कडेकोट रेल्वे सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी 250 पोलीस मार्गदर्शक तैनात करण्यात आले आहेत (कर्नाटक सरकारचा रामभक्तांसाठी मोठा निर्णय).
3 ‘suspicious’ men detained in Ayodhya ahead of Ram mandir consecration ceremony3
suspicious men detained in Ayodhya
3 suspicious men detained in Ayodhya
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements