भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. यातील काही व्हिडीओ फार मजेशीर असतात, तर काही तुम्हाला नव्या गोष्टींची माहिती देणारे असतात. अनेकदा ते असे काही व्हिडीओ शेअर करतात, जे तुम्हाला खरंच विचार करायला भाग पाडणारे असतात. यात पुन्हा एकदा त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक रोबोट बाथरूम साफ करताना दिसतोय. आनंद महिंद्रा यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) हा व्हिडीओ शेअर केला आहे (Video of Robot Cleaning Bathroom).
AI robot cleaning bathrooms pic.twitter.com/IHj4YvurUs
— Wolf of X (@tradingMaxiSL) December 23, 2023
त्यांनी एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, सोमॅटिकचा एक रोबोट जेनिटर; तुम्हालाही एकट्यालाच बाथरूम साफ करावे लागते का? अप्रतिम! ऑटोमेकर्स म्हणून आम्हाला आमच्या कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट वापरण्याची सवय आहे. पण, माझा विश्वास आहे की हे एप्लिकेशन अधिक महत्वाचे आहे. आम्हाला याची गरज आहे… आता.”
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बाथरूममध्ये एक रोबोट जातो, यानंतर ब्रश आणि वायपर वापरून टॉयलेट सीट आणि बाथरूमची फरशी साफ करताना दिसत आहे. बाथरूम साफ केल्यानंतर, रोबोट पुढचे बाथरूम साफ करण्यासाठी बाहेर जाण्यासाठीचा दरवाजा उघडतो. हा रोबोट अमेरिकेतील सोमॅटिक कंपनीने बनवला आहे. ही कंपनी व्यावसायिक आणि वैयक्तिक जागांसाठी बाथरूम साफ करणारे रोबोट बनवतात.
हा रोबोट जॅनिटर, अनोखे भाग आणि वैशिष्ट्यांसह तयार केला गेला आहे, जो मानवी मदतीशिवाय बाथरूम साफ करण्यास मदत करू शकतो. युजर्स आता संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी या नव्या तंत्रज्ञानावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी यामुळे भविष्यात आपल्याला नोकऱ्या गमवाव्या लागतील, असा युक्तिवाद केला आहे.
दरम्यान, एक्सवर या बाथरुम क्लिनर रोबोटचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्सदेखील वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने विनोदी पद्धतीने लिहिले की, ‘सर, हे कितीही नावीन्यपूर्ण असले तरी… नंतर मशीन साफ करण्यासाठी तुम्हाला माणसाचीच गरज लागेल.’
Video of Robot Cleaning Bathroom
Video of Robot Cleaning Bathroom
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements