अमेरिकेने पाकिस्तानला दिले होते भक्कम पुरावे
Uri Attack
Uri Attack : सीमेपलिकडून घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबरला उरीच्या आर्मी ब्रिगेड हेडक्वार्टरवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. भारतीय लष्कराने चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या तळावर 18 सप्टेंबर 2016 मध्ये (Jaish-e-Mohammed militants) दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या घटनेत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
पाकिस्तानमधील (Pakistan-India) भारताचे तत्कालीन उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी ‘एंगर मॅनेजमेंट : द ट्रब्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान’ या पुस्तकात या हल्ल्यासंदर्भात महत्वपूर्ण उल्लेख केला आहे. उरी हल्ल्यात ‘आयएसआय’ या गुप्तचर संघटनेच्या भूमिकेचे भक्कम पुरावे अमेरिकेने पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांच्याकडे दिले होते, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये अमेरिकी (US-Pakistan) राजदूतांनी सप्टेंबर 2016 मध्ये या घटनेनंतर नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. उरी हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना (Terrorist) जैश ए मोहम्मदला जबाबदार धरले होते. यासंबंधित काही महत्वाचे पुरावे अमेरिकेने पाकिस्तानकडे सोपवले होते. तत्कालीन उच्चायुक्त अजय बिसारिया 2017 पासून 2020 पर्यंत पाकिस्तानमध्ये कार्यरत होते. उरी हल्ल्याच्या (Uri Attack) कटात आयएसआय सामील असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. अमेरिकेने दिलेले पुरावे ठोस होते. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात चौकशी करण्यात येईल, असं शरीफ यांना बोलावं लागलं. मात्र, त्याचा फटका शरीफ यांना बसला.
2017 मध्ये पीएमएल-एन पक्षाच्या प्रमुख पदावरून त्यांना हटवलं गेलं. त्याच्या पुढच्या वर्षीच म्हणजे 2018 मध्ये शरीफ यांना देश सोडून जावं लागलं. शरीफ यांची भेट घेणाऱ्या त्या अमेरिकी राजदूताचं नाव बिसारिया यांनी उघड केलं नाही.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements