जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये आज (शुक्रवार) संध्याकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला. भारतीय जवानांनी देखील प्रत्युत्तरात जोरदार गोळीबार केला. तापर्यंत कोणतीही दुखापत किंवा मृत्यूचे वृत्त नाही आणि गोळीबार सुरू आहे.
राजौरीतील डेरा की गली येथे झालेल्या हल्ल्यात 4 जवान शहीद आणि पाच जण जखमी झाल्यानंतर गेल्या काही आठवड्यांत या भागातील लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. आज संध्याकाळी हा हल्ला त्या ठिकाणापासून 40 किमी अंतरावर झाला.
या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कर संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहे.एक दिवस अगोदर म्हणजेच गुरुवारी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सुरक्षा दलांनी राजौरीतील मांजाकोट परिसरात शोध मोहीम राबवली होती. शोध मोहिमेदरम्यान जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी 4 टिफिन बॉम्ब, आयईडी, एक बुलेट राऊंड, वॉकी टॉकी सेट आणि इतर वस्तू जप्त केल्या.
राजौरी आणि पूंछमध्ये दहशतवाद संपवण्यासाठी सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. दरम्यान, आज सुरक्षा दलांनी राजौरीतील मांजाकोट भागात शोध मोहीम राबवली आणि या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. गुरुवारीच एलजी मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेबाबत मोठी बैठक झाली. या बैठकीत जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी आणि सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राजौरी आणि पूंछमधील दहशतवाद संपवण्यासाठी कोणत्या प्रकारची पावले उचलली जावीत या मुद्द्यावर चर्चा झाली.
Terrorists attacked Army vehicles in Poonch Jammu and Kashmir
Terrorists attacked Army vehicles in Poonch Jammu and Kashmir
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements