‘इतके’ उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता
Tax Rebate Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण ह्या 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) जाहीर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) सादर होणाऱ्या या अंतरिम अर्थसंकल्पात करदात्यांना चांगली बातमी मिळू शकते. नवीन कर प्रणालीअंतर्गत (New Tax Regime) कर सवलतीची (Tax Rebate) मर्यादा ही 7 लाखांहून वाढवून ती 7 लाख 50 हजारापर्यंत केली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आठ लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असू शकते. यामध्ये 50 हजारांचे स्टँडर्ड डिडक्शनचाही समावेश आहे. यासाठी अर्थ विधेयकात बदल केला जाऊ शकतो.
मागील वर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीत कर सवलत मर्यादा ही 5 लाख रुपयांहून 7 लाखापर्यंत करण्यात आली होती. मागील अर्थ संकल्पात नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली होती. त्याशिवाय, जुनी कर प्रणालीचा पर्याय कायम ठेवण्यात आला होता. अंतरिम बजेटमध्ये करदात्यांना दिलासा दिला जाऊ शकतो. याचा उद्देश कष्टकरी मध्यमवर्गीय लोकांना कर सवलती देणे हा आहे. निवडणुकीनंतर सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात काही बदल केले जाऊ शकतात. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रस्तावासाठी वित्त विधेयक आणले जाऊ शकते. कर प्राप्तीची व्याप्ती वाढवण्यासोबतच केंद्र सरकार करदात्यांच्यावरील कराचा बोजा कमी करण्यासाठी काम करत आहे. मूल्यांकन वर्ष 2023-24 मध्ये विक्रमी 8.18 कोटी लोकांनी ITR दाखल केला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के अधिक आहे.
Tax Rebate Budget 2024
नवीन कर प्रणाली पहिल्यांदा 2020 च्या अर्थसंकल्पात जाहीर घोषणा करण्यात आली. अर्थ मंत्रालयाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी नवीन कर प्रणाली (New Tax Regime) आणि जुनी कर प्रणाली (Old Tax Regime) दोन्ही लागू केली आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी आणि कर सूट मिळवण्यासाठी करदाते दोन पर्यायांपैकी एक निवडू शकतात. मात्र, नवीन कर प्रणाली डीफॉल्ट ठेवण्यात आली आहे. तुम्हाला जुन्या कर प्रणालीचे फायदे मिळवायचे असतील तर ते निवडणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, जर तुम्ही तुमच्या कंपनीला तुमच्या पसंतीबद्दल माहिती दिली नसेल, तर आता तुमच्यावर नवीन कर प्रणाली अंतर्गत कर आकारला जाईल.
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements